किशोरी पेडणेकर  File photo
मुंबई

मुंबईतील 65 स्थानकांवर लोकल पाससाठी QR कोड मिळणार - महापौर

सकाळ वृत्तसेवा

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोलकमधून १५ ऑगस्टपासून प्रवास करता येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यासाठी क्यूआर कोडची सुविधा करण्यात येणार होती. मात्र, क्यूआर कोडवरुन रेल्वे आणि राज्यांत मतभेद असल्याचं समोर आलं. या गोंधळानंतर मुंबईकर पेचात पडले होते. पास कसा मिळवायचा? कुठे मिळवायचा? दोन डोस कसे ग्राह्य धरायचे? यासारखे प्रश्न त्यांच्यासमोर होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे मुंबईच्या माहापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. यावेळी त्यांनी गर्दी करु नका, अन् कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहनही केलं आहे.

राज्य सरकार आणि रेल्वे दोघे मिळून क्यूआर कोड आणि लोकल प्रवासासंदर्भात अॅक्शन प्लॅन तयार करत आहेत. मुंबईच्या 65 रेल्वे स्थानकावर क्यूआर कोड मिळणार आहे, त्यामुळे क्यूआर कोड मिळवण्यासाठी गर्दी करु नका, असं आवाहन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं आहे. दोन दिवसांत लोकल पाससाठी मुंबई महापालिका अॅप तयार करणार आहे. या अॅपवर दोन डोस घेतलेल्यांचं लसीचं प्रमाणपत्र असणार आहे, तसेच 32 लाख प्रवाशांसाठी हा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

लसीचे दोन डोस घेतलेल्यानंतर दोन आठवड्यानंतर लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. जर आता तुम्ही दुसरा डोस घेतला असेल तर लगेच तुम्हाला लोकलमध्ये प्रवास करता येणार नाही. दोन डोस घेतल्यानंतर 15 दिवसानंतरच तुम्हाला लोकलमध्ये प्रवासासाठी पास दिला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून क्यूआर कोडसाठी अॅप तयार करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर क्यूआर कोड, पास आणि लोकल तिकटं मिळतील, त्यासाठी रांगा लागतील. मात्र, कोरोनाचे नियम मोडू नका, मास्क वापरा, असं महापौर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT