मुंबई

 उद्या आहे लोकलवर मेगाब्लॉक, जाणून घ्या कोणत्या लाईनवर कधी बंद असणार लोकल ट्रेन्स 

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता.7) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत 
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा  पोहोचतील. ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.  ठाणे येथून सुटणा-या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. दादरनंतर जलद सेवा परळ येथे अप जलद मार्गावर  वळविण्यात येतील. 

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन, पनवेल-बेलापूर/नेरुळ-खारकोपर अप आणि डाऊन 
कधी : सकाळी 10 ते दुपारी 4.16 दरम्यान
परिणाम : पनवेल / बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी ते  पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहे. पनवेलहून ठाणेकडे जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा आणि ठाणे ते पनवेल / बेलापूर साठी जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी विभागात विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/ नेरुळ सेवा ब्लॉक दरम्यान सुरू असेल. 

कुठे : वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रात्री 12.30 ते पहाटे 4 
परिणाम : या ब्लॉक कालावधीत अप-डाऊन जलद मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. मात्र रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणताही मेगाब्लॉक नसेल.

mumbai local train news megablock on all three lines of local read full information

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT