Law for Local Train Reels Shot Sakal Digital
मुंबई

Explainer: लोकल ट्रेन, एक्स्प्रेसमध्ये रिल्स शूट करणे गुन्हा आहे का?

खरंच लोकल ट्रेनमध्ये सेल्फी व्हिडिओ शूट करणे, रिल्स शूट करणे हा गुन्हा आहे का, कायदा काय सांगतो

सकाळ वृत्तसेवा

रेल्वे सुरक्षा दलाकडून अशा चित्रीकरणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशा व्हिडिओवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे

नितीन बिनेकर, मुंबई

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ तरुणीने बेली डान्स करतानाच रिल्स पोस्ट केल्याने वाद निर्माण झालाय.

अशा स्टंटबाजी करणाऱ्या कथित इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. मात्र, खरंच लोकल ट्रेनमध्ये सेल्फी व्हिडिओ शूट करणे, रिल्स शूट करणे हा गुन्हा आहे का, कायदा काय सांगतो हे जाणून घेऊया..

धावत्या लोकलमध्ये व्हिडीओ काढता येते का ?

धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर चित्रीकरण करता येते नाही. चित्रीकरणासाठी रेल्वे प्रशासनाची कायदेशीर अनुमती घ्यावी लागते. रेल्वेला काय चित्रीकरण करत आहात त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानंतर रेल्वे तुम्हाला अनुमती देऊ शकते.

ट्रेनमध्ये रिल्स किंवा सेल्फी शूट करणे गुन्हा आहे का?

धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना सेल्फी घेणे, रिल्स बनविणे  किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे हे रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार गुन्हा आहे.

शिक्षा किती?

रेल्वेच्या कलमांतर्गत अंतर्गत किमान एक हजार रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याच वेळी, जर तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या काठावर पिवळी लाईन ओलांडली तर ५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला महिनाभर तुरुंगवास भोगावा लागू शकतो. रेल्वे कायद्याच्या कलम १४७  नुसार रुळ ओलांडणे हा देखील गुन्हा आहे.

अशी मिळते चित्रीकरणासाठी अनुमती

पब्लिक रिलेशन मॅन्युअल पॉलिसी २००७ नुसार, चित्रीकरण करण्याची अनुमती दिली जाते. यासाठी रेल्वे चित्रीकरण करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीकडून नियमानुसार रक्कम वसूल करते. याशिवाय चित्रीकरण करते वेळी सुरक्षा सुद्धा प्रदान केली जाते. 

विशेष म्हणजे चित्रीकरणाच्या विषय, संवादाची संपूर्ण माहिती चित्रीकरणाच्या अगोदरच रेल्वेला कागदोपत्री सादर करावीत लागते. त्यानंतर रेल्वे त्याची पडताळणी केल्यावर चित्रीकरनाची अनुमती दिली जाते.

...तर मोबाईल, कॅमेरा जप्त होईल

विना परवानगी रेल्वे गाड्या किंवा रेल्वे परिसरात चित्रीकरण केल्यास आणि सोशल मीडियावर ते चित्रीकरण प्रदर्शित केल्यास रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार कारवाई केली जाते.  या कारवाईत चित्रीकरण करण्यात आलेल्या साहित्य अर्थात कॅमेरा, मोबाईल जप्त करण्याची तरतूद आहे.

तुमच्या सोशल मिडियावरील व्हिडिओवर रेल्वेचे लक्ष ?

रेल्वे सुरक्षा दलाकडून अशा चित्रीकरणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशा व्हिडिओवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. "धावत्या लोकलमध्ये असे व्हिडिओ काढण्यास बंदी आहे.

रेल्वे प्रवाशांना आवाहन आहे की, रेल्वे गाड्यात आणि रेल्वे परिसरात असे डान्स करू त्यांचे चित्रीकरण करू नयेत. अन्यथा रेल्वेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल", अशी प्रतिक्रिया मुख्य  जनसंपर्क अधिकारी डॉ.शिवराज मानसपुरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT