मुंबई

आजपासून मध्य रेल्वेवरच्या CSMT ते कल्याण दरम्यान प्रवाशांचा प्रवास गारेगार

प्रशांत कांबळे

मुंबई:  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर कल्याण दरम्यान एसी लोकल चालवण्यासाठी रेल्वे मंत्रालयासह राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आठवड्यातून सहा दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार दैनंदिन 10 एसी लोकल फेऱ्या धावणार असून रविवारी मात्र एसी फेऱ्या बंद राहणार आहे. गुरुवारी म्हणजेच आज पहिली एसी लोकल कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान धावणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर यापूर्वी एक एसी लोकल देण्यात आली होती. या लोकलला ठाणे ते पनवेल दरम्यान ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सोडण्यात आले होते. मात्र अद्याप मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलची सेवा नाही. मात्र आता मध्य रेल्वेने एसी लोकलचा निर्णय घेतल्याने मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आता गारेगार आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.

सीएसएमटी ते कल्याण दरम्यान लागणाऱ्या सर्व स्थानकावर या एसी लोकलचा थांबा राहणार असून, कोविड नियमांच्या अधीन राहून राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच यामध्ये प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. सर्वात पहिली लोकल सकाळी 5.42 मिनिटाने कुर्ला येथून सुटणार असून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सकाळी 6.12 वाजता पोहोचणार आहे. त्याप्रमाणे इतर स्थानकावर नियोजित वेळापत्रकाराप्रमाणे धावणार आहे.

प्रस्थान आगमन
स्टेशन - वेळ  स्टेशन - वेळ
   
कुर्ला - 5.42 सीएसएमटी - 6.12
सीएसएमटी - 6.23 डोंबिवली - 7.40
डोंबिवली - 7.47  सीएसएमटी - 9.8
सीएसएमटी - 9.12 कुर्ला - 9.40
कुर्ला - 4. 36 सीएसएमटी - 5.8
सीएसएमटी - 5.12 कल्याण - 6.42
कल्याण - 6.51 सीएसएमटी - 8.18
सीएसएमटी - 8.22 डोंबिवली - 9.40
डोंबिवली - 9.59 सीएसएमटी - 11.19
सीएसएमटी - 11.25 कुर्ला - 11.53

मध्य रेल्वे नंतर हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा एसी लोकल लावण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आहे. लवकरच हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा एसी लोकलची चाचणी घेण्यात येणार असल्याचे ही रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai local train update 10 ac local services csmt kalyan today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

Kanha Tiger Reserve : जंगलाचा राजा 'कान्हा'मध्ये संकटात! जानेवारीपासून 25 वाघांनी गमावले प्राण, व्याघ्र प्रकल्पात नक्की काय घडतंय?

SCROLL FOR NEXT