Mumbai Railway sakal media
मुंबई

रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक!

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी (Mumbai Suburban Railway) मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी 4 जुलै रोजी मेगाब्लॉक (Mega block On 4 July) घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशी दरम्यान, ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ( Mumbai Local Trains repairing Issue Mega block on 4th July Sunday)

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान

परिणाम : ब्लाॅकदरम्यान मुलुंड ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. अप दिशेकडील लोकल मुलुंडनंतर जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी दाखल होतील.

कुठे : हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन (बेलापुर/नेरुल-खारकोपरसह)

कधी : सकाळी 11.05 ते सांयकाळी 4.05 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन दिशेकडील लोकल रद्द केल्या जातील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष सेवा चालविल्या जातील. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन सेवा रद्द केली आहे. खारकोपर ते नेरुळ/बेलापूर अप आणि डाऊन बीएसयूवरील सेवा रद्द केली आहे.

ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी/नेरुळ सेवा सुरू असेल.

कुठे : बोरीवली ते गोरेगाव अप जलद मार्गावर

कधी : शनिवार-रविवारी रात्री 11.00 ते रात्री 3

परिणाम : या ब्लाॅक कालावधीत बोरीवली ते गोरेगाव अप जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voting: ईव्हीएम मशीनमध्ये चारपैकी कमी मतदान केल्यास काय होईल? जाणून घ्या मतदारांच्या मनातल्या प्रश्‍नांची उत्तरं

Makar Sankranti Tragedy : मकर संक्रातीच्या सणाला गालबोट! लेकीला घरी आणायला निघालेल्या पित्याचा वाटेतच चायनीज मांजाने घेतला बळी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित दिसत आहे - भाजप नेत्या पूनम महाजन

Goa Tourism: गोव्याला फिरायला जाताय? तर अगुआडा किल्ल्यावरून हे दृश्य पाहायलाच हवे!

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये निवडणुकीआधी पोलिसांचा दणका! ६१ लाखांचे मद्य आणि सव्वाआठ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT