mumbai-train.jpg 
मुंबई

मुंबई: लोकलमधील प्रवासी संख्येबाबत महत्त्वाची माहिती

दीनानाथ परब

मागच्या आठवड्याभरात मुंबईत लोकल ट्रेनमधुन प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. सणाचा काळ आहे म्हणून की, कोविड-१९ च्या भीतीमुळे ही प्रवासी संख्या कमी झालीय, ते अजून स्पष्ट झालेले नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासीसंख्या १५ लाखापेक्षा कमी झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी आपण आठवडाभर थांबूया. दुसऱ्या लाटेमुळे प्रवासी लोकल पासून दूर राहतायत कि, होळी आणि अन्य सणांमुळे ते लवकरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महाराष्ट्र सरकारने १५ मार्चपासून खासगी कार्यालयांमध्ये उपस्थिती ५० टक्क्यापर्यंतच ठेवावी, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर लोकल मधील प्रवासी संख्या कमी झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारी १३ लाख प्रवासी संख्या होती. मध्य रेल्वे मार्गावर हाच आकडा १५ लाख आहे. मागच्या महिन्यापर्यंत दोन्ही रेल्वे मार्गावर दररोज २० लाखापर्यंत प्रवासी संख्या होती. मिड डे ने हे वृत्त दिले आहे. 

लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबत राज्य सरकारने कोणताही संपर्क साधलेला नाही. रेल्वेकडून प्रवाशांना मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि दुसऱ्या राज्यात जाताना नियम जाणून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता, लोकल ट्रेनमधून प्रवासी संख्या कमी होणे, ही तूर्तास चांगली बाब आहे. कारण मुंबईत कोरोना रुग्णवाढीला लोकल सेवेला जबाबदार धरण्यात येत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT