Kharkopar-Uran railway line in final stage local run on route in few days mumbai  sakal
मुंबई

Mumbai Local: उरण लोकल सुरु मात्र नागरिकांना करावा लागत आहे मोठ्या प्रमाणावर खर्च

Navi Mumbai: Belapur/Nerul-Kharkopar-Uran corridor started. However, the cost to citizens is huge.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या उरण ते खारकोपर लोकल मार्ग अखेर सुरू झाली आहे. या सुविधेमुळे उरण तालुक्यात राहणारे शहरी व ग्रामीण भागातील नागरिक नवी मुंबई शहराशी जोडले गेले आहेत; पण दुसरीकडे स्थानकांपर्यंत येण्यासाठी रिक्षांशिवाय पर्याय नसल्याने प्रवासखर्च वाढला आहे. उरण परिसरात गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. कंटेनर यार्ड तसेच गोदामांमुळे मुंबई, नवी मुंबई, पनवेल शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उरण परिसरात येत आहेत.

तसेच उरणमधूनही नागरिक, विद्यार्थी शिक्षण व कामधंद्यासाठी मुंबई नवी मुंबईत जातात. त्यामुळे उरणकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी नेरूळ उरण रेल्वे सुरू करण्यात आली आहे; पण उरण परिसरातील शहरी तसेच ग्रामीण भाग उरण रेल्वे स्थानकांपासून काही अंतरावर असल्याने स्थानक गाठताना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.

न्हावा-शेवा रेल्वे स्थानक जवळ आहे; तर द्रोणागिरी नोडमधील नागरिकांना बोकडविरा गावाच्या हद्दीत असणारे द्रोणागिरी हे रेल्वे स्थानक जवळ पडत आहे. उरण पूर्व विभाग ते नवघर गावाच्या हद्दीत असणारे न्हावा-शेवा स्टेशन येथील रिक्षाचे भाडे शेअरिंगमध्ये ३० रुपये आहे; तर एकट्या व्यक्तीला शंभर रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी परिवहनच्या बस सुरू करण्याची मागणी उरण परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

उरण परिसरात नवीनच लोकल रेल्वे सुरू झाली आहे. मी उरण पूर्व विभागातून लोकल रेल्वेने प्रवास करत आहे. दररोज येऊन रिक्षाला साठ रुपये देणे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातून परिवहनच्या बस सुरू करण्यात याव्यात.
- तुषार पाटील, रहिवासी, उरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT