मुंबई

Mumbai Local: मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात; मात्र सिग्नल यंत्रणेचा दोष चव्हाट्यावर

Mumbai Local: याच सिग्नलवर पुन्हा १२.३५ वाजता असाच प्रकार घडला आहे. या सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे अपघात होण्याची भीती मोटारमननी व्यक्त केली आहे.

Chinmay Jagtap

रेल्वे सिग्नल दोषामुळे शनिवारी दोन उपनगरीय लोकल ट्रेनच्या मोठा अपघात होता होता थोडक्यात टळला. मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असला तरी, त्यांनी काढलेल्या फोटोमुळे रेल्वे सिग्नल यंत्रणेत तांत्रिक दोष चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२.२० वाजता सीएसएमटीच्या दिशेने जाणार्‍या लोकलला उल्हासनगर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल क्र. ५६०२ येथे दोन सिग्नल पिवळ्या रंगाचे असल्याने मोटारमन यांनी नियमाप्रमाणे लोकल पुढे घेऊन गेला. मात्र, काही अंतरारच पुढे दुसरी गाडी असल्याचे मोटरमॅनच्या निदर्शनात आल्याने त्यांनी तत्काळ ब्रेक लावला. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. याच सिग्नलवर पुन्हा १२.३५ वाजता असाच प्रकार घडला आहे. या सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे अपघात होण्याची भीती मोटारमननी व्यक्त केली आहे.

फोटोमुळे समोर आला सिग्नल दोष -

सिग्नल तोडल्यावर रेल्वेकडून नेहमीच मोटरमन कारवाई केली जाते. त्यामुळे या घटनेतही आपल्यावर कारवाई होईल म्हणून मोटरमॅनने अगोदरच सिग्नल पॉईंटवरील दोन सिग्नल पिवळे असल्याचा फोटो मोबाईलमध्ये फोटो टिपले होते. त्यामुळे रेल्वे सिग्नल यंत्रणेत तांत्रिक दोष समोर आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपनगरीय मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT