Mumbai Local Viral Video sakal
मुंबई

Mumbai Local Viral Video : दीदी लोकलमधुन बाहेर पडली मात्र चप्पल आतच सोडून आली...फनी व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local : मुंबईची लोकल आणि मुंबईचा पाऊस हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.अशातच सध्या मुंबईची गर्दी ही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल होताना आपण पाहत आहोत.

अशावेळी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईची लाईफ लाईन जरी लोकल असली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे या लाईफ लाईन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला प्रवासी गर्दी असलेल्या लोकलमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करत आहे. मात्र तिला ती लोकल सोडावी लागत आहे. मात्र लोकल सोडताना तिच्या पायातली एक चप्पल ही राहिली आहे.

मुंबई लोकलचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना सध्या दिसत आहे. आमची मुंबई या नावाच्या पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला चांगलेच लाईक मिळत असून मोठ्या प्रमाणावर लोक हा व्हिडिओ शेअर करत आहे

व्हिडिओचा कॅप्शन मध्ये लिहिण्यात आले आहे की, तुमच्या सोबत हे कधी झालंय का? खरं म्हणजे हे आजपर्यंत कित्येक नागरिकांसोबत झाले आहे. प्रवास करताना जर चप्पल घातली असेल तर ते कित्येकदा चढताना किंवा उतरताना ती लोकलमध्ये राहते. पण नक्की ही महिला कोण आहे? हे या व्हिडिओ मधून समजत नाहीये.

मात्र आजवर कित्येक मुंबईकर यांच्या चपला लोकल मधून प्रवास करताना अशाच प्रकारे पडल्या आहेत. अशा कमेंट लोक करत आहेत. एकानेतर अशी कमेंट केली आहे की, विरार ते चर्चगेट मध्ये अस कित्येक लोकांसोबत होतं. कित्येक जण यांच्या अवस्थेबद्दल हसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT