Mumbai Local News : sakal
मुंबई

Mumbai Local News : मुंबई लोकलच्या सर्वात मोठ्या बोगद्याचे काम पूर्णत्वाकडे !

२.६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Chinmay Jagtap

Mumbai Local News : पनवेल-कर्जत या नवीन २९ किलोमीटरच्या मार्गावरील सर्वात लांब बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या २ हजार ६२४ मीटरपैकी १ हजार मीटरचे भूमिगत खोदकाम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत दरम्याचा प्रवासाचा वेळ २० मिनिटे वाचणार असल्याची माहिती ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’ने दिली आहे.

पनवेल ते कर्जत एकच रेल्वे मार्ग असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते.

त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गिकेच्या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती. कोरोनामुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली.

जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली. पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला २ हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. या प्रकल्पात नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे बांधले जातील.

पनवेल-कर्जत यांना जोडणारा सध्या एकेरी मार्ग असून तो पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. नव्या मार्गावर तीन बोगदे असतील. वावर्ले हा बोगदा २,६०० मीटर लांबीचा आहे. नढालची लांबी २१९ मीटर आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे. या बोगद्याव्यतिरिक्त दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून कर्जतजवळील उड्डाणपूल १,२२५ मीटर आणि पनवेललगतचा पूल १,३७५ मीटरचा आहे. मार्च २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT