मुंबई

मर्यादित वेळेतच Mumbai Local चा निर्णय हास्यास्पद आणि निरर्थक; भाजपनेत्याचा टोला

कृष्ण जोशी

मुंबई  - सर्वसामान्यांना मर्यादित वेळेतच उपनगरी लोकलसेवा वापरू देण्याचा निर्णय निरर्थक आहे. त्यामुळे राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सामान्यांसाठी पूर्णवेळ लोकलगाड्या सुरु कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. मागीलवर्षी मार्चअखेरपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या उपनगरी रेल्वेसेवा आता एक फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत, तसेच दुपारी बारा ते चार पर्यंत आणि रात्री नऊनंतर शेवटच्या लोकलपर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा मिळाली आहे.   

हा निर्णय केवळ धूळफेक असून सामान्य नोकरदारांना सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असते. तरीही केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. 

एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास कोरोना वाढेल असे कारण देणाऱ्या ठाकरे सरकारने दुसरीकडे दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल, बाजारपेठा, बस, लक्झरी, देवळे, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होणार नाही व फक्त लोकलगाड्यांमध्येच कोरोनाचा फैलाव होईल, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा प्रश्नही भातखळकर यांनी विचारला आहे. 

मुंबईतील उपनगरे व शेजारील शहरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना सध्या रेल्वेसेवा बंद असल्याने रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यातही पूर्व व पश्चिम महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडी मुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ पूर्णवेळ लोकल सुरू करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारासुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Mumbai Locals train start decision in a limited time is ridiculous and meaningless Criticism of BJP leader

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT