balasaheb thackeray sakal
मुंबई

Mumbai Loksabha: बाळासाहेबांमुळे गंगुबाईचा कामाठीपुरा टिकला; त्यांचे आमच्यावर ऋुण

कामाठीपुराच्या बदनाम समजल्या जाणाऱ्या या गल्लांमध्येही आजही बाळासाहेब ठाकरे यांना देवासारखे मानले जाते |Balasaheb Thackeray is still considered as a god even in these infamous streets of Kamathipura

सकाळ वृत्तसेवा

नितीन बिनेकर,सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कधी काळी ५० हजार सेक्सवर्क असलेल्या कामाठीपुऱ्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या पंतप्रधानापर्यंत पोहचविण्याऱ्या गंगुबाईचा कामाठीपुरा केवळ बाळासाहेब ठाकरेमुळे टिकला. त्यामुळे आमच्यावर बाळासाहेबांचे ऋुण असल्याच्या भावना कामाठीपुऱ्यातील सेक्सवर्कची आहे. कामाठीपुराच्या बदनाम समजल्या जाणाऱ्या या गल्लांमध्येही आजही बाळासाहेब ठाकरे यांना देवासारखे मानले जाते.

देहविक्रीवर बंदी घालण्याचा अनेकदा डाव रचले गेले. परंतु, बाळासाहेबांच्या खमक्या भूमिकेमुळे आमचे अस्तित्व टिकून राहील्याची भावना काजल यानी व्यक्त केली.त्यांचे उपकार आमच्यावर अजूनही आहे.

बाळासाहेबांबद्दल ऐकले मात्र त्यांना बघता आले नाही याची काजल यांना अजूनही खंत आहे. अलिकडे राजकीय पक्षापेक्षा सामाजिक संस्था आमच्यासाठी चांगले काम करत असल्याचे त्यांनी सकाळसोबत बोलताना मान्य केले.कामाठीपुऱ्यात देहविक्री करणाऱ्या अनेक महिलांची शिवसेनेबद्दल अशाच भावना आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या कामाठीपुरा परिसरात सुरुवातीपासून शिवसेनेची चांगली पकड आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्पाची योजना आखली होती.

मात्र, सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे सदर योजना रखडली. तर, दुसरीकडे या भागात स्थानिक आमदार अमीन पटेल हे देखील सक्रीय असतात. कामाठीपुऱ्यात आमदार अमीन पटेल याचे कार्यालय आहे. त्यामुळे त्यांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे या पट्ट्यात शिवसेनेचा चांगलाच प्रभाव असल्याचे स्थानिक महिलांच्या बोलण्यातून जाणवते.

गल्लीतील विकासकामे

कामाठीपुऱ्यात एकूण १४ गल्ल्या आहेत. यापैकी ११,१२,१३ आणि १४ या गल्लात देहविक्री चालत असल्यामुळे लोक या भागाकडे वाईट नजरेने बघतात. अनेक लोकप्रतिनिधी या गल्लीतील समस्यांकडे दुर्लक्ष करतात.

मात्र, गेल्या काही वर्षात १ ते १४ या हाऊस गल्लीत विकास कामे झाल्याची प्रतिक्रीया सेक्स वर्करने सकाळने व्यक्त केली आहे. गल्ली क्रमांक १३ मध्ये दरवर्षी रक्षाबंधन, गणपती आणि नवरात्र उत्सवात विद्यमान खासदार अऱविंद सांवत सहभागी होत असल्याचे इथल्या राहीवाशांनी सांगीतले.

-------------

सेक्सवर्क संख्या कमी

१७९५ मुंबईचे सात बेटांना जोडणारे मार्ग बांधण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात मजूर आणले होते. हे मजूर जिथे राहत होते. या परिसराला लालबाजार म्हणून ओळखलं जात होते. पालिका मुख्यालय, सीएसएमटी सारख्या हेरिटेज इमारतीचे बांधकाम मजुरांकडून करण्यात आले होते.

मात्र, काही कालावधीनंतर काम बंद झाल्यामुळे इथे राहणाऱ्या महिलांनी नाईलाजाने देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. १९९२ मध्ये कामाठीपुऱ्यात देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या साधारण ५० हजार एवढी होती. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात एचआयव्हीच्या वाढीमुळे आणि सरकारच्या पुनर्विकास धोरणामुळे सेक्स वर्कर्सना या व्यवसायातून बाहेर पडण्यास मदत झाली. आज कामाठीपुऱ्यात देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या केवळ १६०० वर आली आहे.

---------

चार गल्लीमुळे नाव बदनाम

कामाठीपुऱ्यामधील चार गल्लीतच देहविक्रीच्या व्यवसाय चालतोय. परंतु, या चार गल्ल्यामुळे संपूर्ण कामाठीपुऱ्याकडे लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतो. देहविक्रीचा व्यवसाय दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात काही पाऊल उचलले गेली होती.मात्र त्याचे पुढे काही झाले नाही.

-------------

कामाठीपुराच्या समस्या

-धोकादायक इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न

- चाळीचा पुनर्विकास

- देहविक्री व्यवसाय हलवण्याचा प्रश्न

- वाहतूक कोंडी, अतिक्रमण

- मानव तस्करीवर आळा घालण्याचे आव्हान

- आरोग्य सुविधांचा अभाव

कामाठीपुऱ्यात काँग्रेसने देहविक्री करणाऱ्या महिलांपासून ते सामान्य जनतेलासमोर ठेवून काम केले आहे. नवीन शाळा, रोड आणि रुग्णालय तयार होत आहे.

- अमीन पटेल, आमदार,मुंबादेवी

माझ्या कुटुंबियांच्या चार पिढ्या रेड लाइट एरियात गेल्या आहेत. बाळासाहेबानंतर आजपर्यंत एकाही लोकप्रतिनीधींनी आमच्याकडे ढूंकून बघीतले नाही.मात्र, अलिकडे हे चित्र बदलले आहे.

अल्लपा महादेव चलवादे, स्थानिक नागरिक

बदमान असलेल्या गल्लामध्ये यंदा विकास कामे पहिल्यांदा पोहोचली आहेत.ऐरवी आम्हाला माणसांमध्येही धरल्या जात नव्हते.

यशवंती (नाव बदलेले ) वय- ६० वर्षे

बाळासाहेब आज असते कामाठीपुऱ्याचा विकास निश्चित झाला असतात. शिवसेनेत फुटही पडली नसती.

मनिषा (नाव बदलेले )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT