dadar chaityabhumi sakal
मुंबई

Mahaparinirvan Din : मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची तयारी पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दादरमधील वाहतूक वळवण्याबाबत आणि वाहतूक निर्बंध जारी केले आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादरच्या परिसरात रस्त्यांवर वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादरच्या परिसरात काही मार्ग वाहतुकसाठी वळवण्यात आले असून काही मार्ग वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी या जारी केलेल्या आदेशात जनतेला धोका गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत सुरळीत व्हावी यासाठी 5 डिसेंबर सकाळी 6.00 वाजल्यापासून खालील वाहतूक निर्बंध लागू केले जातील. 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत वाहतूक निर्बंध लागू असतील.

दादरमधील हे रस्ते बंद/ काही एकेरी मार्गाने

1. स्वतंत्र वीर सावरकर रस्ता सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील. तथापि, स्थानिक रहिवासी येस बँक जंक्शन येथून डावीकडे वळणे घेऊन पुढे जाऊ शकतात आणि पांडुरंग नाईक रोडने राजा बडे चौकाकडे जातील.

2. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगज चर्च जंक्शन असा एकेरी मार्ग असेल. म्हणजे बोले रोडच्या दक्षिण सीमेकडून वाहनांच्या वाहतुकीला प्रवेश नसेल.

3. रानडे रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

5. ज्ञानेश्वर मंदिर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील

6. जांभेकर महाराज रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

7. केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.

8. एम. बी. राऊत रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

9. एलजे रोड शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी कटारिया रोड बंद राहील.

खालील रस्त्यांवर स अवजड वाहनांना प्रवेशबंदी

- एस. व्ही. एस रोड - माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन

- एलजे. रोड - माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन

- गोखले रोड - गडकरी जंक्शन ते धनमील नाका.

- सेनापताई बापट रोड - माहीम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका

- टिळक पुलापासून ते सर्व एन. सी. केळकर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

या ठिकाणी पार्किंग उपलब्ध -

- सेनापती बापट मार्ग, माहीम आणि दादर पश्चिम.

- कामगार स्टेडियम (सेनापती बापट मार्ग).

- इंडिया बुल्स इंटरनॅशनल सेंटर, (सेनापती बापट रोड, एल्फिन्स्टन).

- वन इंडिया बुल्स सेंटर, ज्युपिटर मिल कंपाउंड, एल्फिन्स्टन वेस्ट.

- कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कंपाउंड, दादर.

- लोढा, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल.

- पाच गार्डन्स, माटुंगा पूर्व.

- एडेनवाला रोड, माटुंगा पूर्व.

- नथाला पारेख रोड, माटुंगा पूर्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कांदा आता प्रतिक्विंटल सरासरी १५०० रुपये! गुरुवारी सोलापूर बाजार समितीत २०९ गाड्यांची आवक; एक महिन्यात ५० कोटींची उलाढाल

Viral : किती खाणेरडापणा! 19 मिनिट 30 सेकंद व्हिडिओचा पार्ट 2 व्हायरल? शेअर होतीये लिंक; पोलिसांची वॉर्निंग

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

Navale Bridge Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT