मुंबई

अमिबालाही लाजवेल इतक्यावेळा शिवसेना भूमिका बदलते; एल्गार परिषद ते शेतकरी आंदोलनावरून आशिष शेलारांचा घणाघात

तुषार सोनवणे

मुंबई - 'शिवसेनेचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारावासा वाटतो. एल्गार परिषदेत शरजिल उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय आहे? मुळात या परिषदेमध्ये सामाजात तेढ निर्माण करणाऱ्या टीपण्या केल्या जातात हा अनुभव आहे. तरी देखील परिषदेला परवानगी का देण्यात आली? त्याने केलेल्या विधानानंतर त्याला राज्यातून बाहेर कसे जाऊ दिले. हिंदूंवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजिला महाविकास आघाडीने राज्याबाहेर पळवले आहे. राज्याबाहेर जाण्यासाठी सरकारनेच त्याला मदत केली आहे. त्याला पळून जाऊ दिल्या नंतर, भाजपने दोन दिवस आवाज उठवल्या नंतर, आता आम्ही गुन्हा दाखल करू असं म्हणतातय. हिंदूंना सडक्या म्हणणाऱ्यांना वाचवण्याचं पाप सरकारने का केलं हे जनतेसमोर यायला हवे. अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे

'हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देत, दोन पक्षाच्या कुबड्यांनी सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेने भाजपला हिंदूत्व शिकवू नये. त्यांनी हिंदूत्वाचा आमच्याकडे क्लास लावावा. खाली डोकं वर पाय अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. परराज्यातून कोणीही महाराष्ट्राबद्दल बोलले तर यांना लगेच महाराष्ट्र द्रोह आठवतो आणि हे आंदोलीत होतात. परंतु परदेशातून आपल्या देशातील विषयांबाबत कोणी टीका टीपण्णी केली तर, शिवसेनेला आनंदाच्या उकळ्या फुटतात. परदेशाशी संजय राऊत यांचं कनेक्शन काय आहे हे जनते समोर मांडावं. लाल किल्यावरचा तिरंगा उतरवून दुसरे झेंडे लावणे याला संजय राऊत यांचं समर्थन आहे का ? त्यावेळी तुम्ही का बोलला नाहीत.'असा सवालही शेलार यांनी केला आहे.

शिवसेनेची महाराष्ट्रातील शेतकरी मोर्चाच्या वेळी काय भूमिका होती ? कृषि विधेयकं पारित होत असताना लोकसभेत भूमिका काय होती.? अमिबाला सुद्धा लाज वाटावी इतक्या वेळा बाजू आणि भूमिका बदलणारा पक्ष शिवसेना बनला आहे. अशी कठोर टीकाही शेलार यांनी केली आहे

सुप्रिया सुळे यांनाही सवाल

शेतकरी आंदोलनक कर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही शेलार यांनी टीका केली. बारामती अॅग्रोच्या माध्यमांतून बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू आहे. नव्या शेती सुधारणा कायद्यात तोच मुद्दा आहे. मग आपण बारामतीच्या शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंचे धडे का देत आहात? आधी त्यांचं उत्तर द्यावं मग दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटायला जावं असेही शेलारांनी म्हटले आहे.

mumbai maharashtra marathi political latest politics marathi news elgar parishad sharjil usmani bjp ashish shelar criticism on Shiv Sena on farmers protest

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT