राज्याभिषेक सोहळा  sakal
मुंबई

Mumbai : महाराष्ट्राचे आराध्य साकारणारा शिल्पकार ;५० दिवसात साकारली शिवरायांची ती चांदीची मूर्ती

नितीन यांना लहानपनापासूनच चित्रकलेची आवड होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्यावतीने रायगडावर नुकताच ३५०वा राज्याभिषेक सोहळा शाही थाटात पार पडला. या सोहळ्यातील शिवरायांची चांदीची मूर्ती हे उपस्थितांचे आकर्षण ठरली. ही मूर्ती मुंबईकर शिल्पकार नितीन गोरडे यांनी केवळ ५० दिवसात साकारली होती. इतकेच नाही तर नितीन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, पु.ल. देशपांडे, सचिन तेंडुलकर, अमीर खान यांच्यासारख्या दिग्गज मंडीळीची शिल्पे ही साकारलेली आहेत.

नितीन यांना लहानपनापासूनच चित्रकलेची आवड होती. तिसरीत असताना घराच्या जवळच गणपती बनवण्याच्या कारखान्यात त्यांनी मोठी शिल्पे बनविण्याची कला आत्मसात केली. नितीन यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. गॅरेजलाच लागून असलेल्या एका कारखान्यात गेल्यावर नितीन यांच्या वडिलांच्या लक्षात आले की या क्षेत्रात भविष्य उज्वल आहे. म्हणून त्यांनी मुलाने या कलेत पारंगत व्हावे असे वाटले. ताडदेवच्या म्युन्सिपल हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण होताच नितीन यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‍समध्ये पोर्ट्रेट या विषयात पदवी घेत २००१मध्ये व्यावसायिकदृष्ट्या कार्यास सुरुवात केली.

२००२मध्ये पु.ल. देशपांडे यांचा आठ फुट उंचीचे शिल्प तयार केले. आजही हे शिल्प प्रभादेवीतल्या पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये पाहायला मिळेल. नितीन यांनी आजवर ५०० हुन अधिक पुतळे साकारले आहेत. मुंबईत आपल्याला दिसणारे लालबहादूर शास्त्री (रिगल सिनेमाजवळील पुतळा), शहीद तुकाराम ओंबळे (गिरगाव चौपाटी),छत्रपती शिवाजी महाराज (कळवा) यांसारखे वेगवेगळे पुतळे त्याने साकारले आहेत. २००८साली गजनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमीर खान यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे ५० पुतळे साकारण्याचे काम नितीन यांनी केले. स्वत: आमिर खान यांनी जगभरातील कलाकारामधून नितीन यांची निवड केली होती. देशभरातील चित्रपटगृहात हे पुतळे झळकले होते.

नितीन यांनी आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक शिल्प साकारली आहेत. मातीसह वेगवगेळ्या धांतूंमधील महाराजांची शिल्पे त्यांनी साकारली आहेत. मात्र देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे शौर्य रेखाटणारे प्रभावी आणि परिपूर्ण शिल्प अद्याप पर्यंत आपल्या हातून साकारले गेले नाही असे नितीन यांना वाटते. भविष्यात महाराजांचे परिपूर्ण शिल्प बनविण्याचा मानस नितीन यांनी व्यक्त केला.

"३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी लागणारी छत्रपती शिवरायांची मूर्ती घडविण्याचे काम मला मिळाले हे माझे मी भाग्य समजतो. समितीच्या पदाधिकार्यांनी कुठेतरी मी बनवलेले महाराजांचे छोटे शिल्प पहिले. हे शिल्प कोणी बनविले याचा मागोवा घेत ते माझ्यापर्यंत आले. त्यावेळेस सोहळ्याला केवळ ५० दिवस बाकी होते. इतक्या भाग्याचे हे काम मी केवळ वेळेअभावी नाकारू शकत नव्हतो. म्हणून मी केवळ ५० दिवसात हे शिल्प तयार केले. शिल्प तयार होईपर्यंत मला माहित नव्हते की हे शिल्प ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर नेण्यात येणार आहे."

-नितीन गोरडे, शिल्पकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT