babulnath temple mumbai sakal
मुंबई

Mahashivratri : पिंडीची हानी टाळण्यासाठी महाशिवरात्रीला बाबुलनाथ येथे फक्त बेल, फुल व जलाभिषेक

बाबुलनाथ मंदिराच्या शिवपिंडीवर हळद, कुंकू, चंदन वाहिल्याने त्याची झीज होत असल्याच्या आयआयटीच्या अहवालामुळे आता महाशिवरात्रीला तेथे फक्त बेल-फुले वाहण्यास व जलाभिषेकास परवानगी.

सकाळ वृत्तसेवा

बाबुलनाथ मंदिराच्या शिवपिंडीवर हळद, कुंकू, चंदन वाहिल्याने त्याची झीज होत असल्याच्या आयआयटीच्या अहवालामुळे आता महाशिवरात्रीला तेथे फक्त बेल-फुले वाहण्यास व जलाभिषेकास परवानगी.

मुंबई - बाबुलनाथ मंदिराच्या शिवपिंडीवर हळद, कुंकू, चंदन वाहिल्याने त्याची झीज होत असल्याच्या आयआयटीच्या अहवालामुळे आता महाशिवरात्रीला तेथे फक्त बेल-फुले वाहण्यास व जलाभिषेकास परवानगी देण्याचा निर्णय आज पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

यासंदर्भात मंदिर ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच भाविकांचे प्रतिनिधी आणि पुरोहित आदींची बैठक मंत्रालयात झाली. कोरोना काळात मंदिरात पूजा विधीवर प्रतिबंध होते. तसेच शिवलिंगावर दूध, हळद-कुंकू, चंदनाचा लेप आदी पूजा साहित्य वाहिल्याने पिंडीची झीज होत होती, असा अहवाल आयआयटीने दिला होता. तर आता कोरोना संपल्याने पूजाविधी पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली होती. त्यासंदर्भात स्थानिक आमदार असलेल्या लोढा यांनी बैठक घेऊन हा तोडगा जाहीर केला.

हे मंदिर ऐतिहासिक ठेवा असल्याने शिवलिंगाची झीज, नुकसान होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. पण त्याचवेळी भाविकांच्या भावनाही महत्वाच्या आहेत. त्यामुळे पूजेबाबत हा तोडगा काढण्यात आला आहे. मंदिराची एकंदर सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याने यानुसार सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी, असे आवाहन लोढा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मंत्रालयाजवळ पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती, वाहतूक कोंडीचा सामना, बेस्ट मार्गात बदल

18 Carat Gold Jewellery: 18 कॅरेट सोन्यात काय मिसळले जाते? तुम्ही कोणत्या प्रकारचे दागिने बनवू शकता?

महाकुंभातील व्हायरल गर्ल लवकरच चित्रपटात, मोनालिसा भोसले दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार?

India Investment in Nepal: भारताने नेपाळमध्ये किती पैसे गुंतवले? हिंसाचारामुळे कोणत्या प्रकल्पांवर परिणाम होणार?

संतापजनक! मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली रशियन महिलेचा अश्लील डान्स, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT