electricity
electricity sakal
मुंबई

Electricity : मुंबईकरांची महावितरणकडून १३४० दशलक्ष युनिट इतकी अतिरिक्त वीजखरेदी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मागील एक आठ्वड्यापासून मुंबईत उकाडा प्रचंड वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता वीज वितरण कंपन्यांनी अतिरिक्त वीज खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३ महिन्यांत १३४० दशलक्ष युनिट इतकी अतिरिक्त वीज खरेदी केली आहे.

महावितरणने विजेच्या वाढत्या मागणीचा अंदाज घेता लघुकालीन कराराच्या माध्यमातून तीन महिन्यात एकूण ११०० मेगावॅट वीज खरेदी केली. तसेच, महावितरणने पॉवर एक्सचेंजच्या सुविधेचाही लाभ घेतला आहे. याद्वारे महावितरणने तीन महिन्यात एकूण ६८४ दशलक्ष युनिट इतकी वीज घेतली. महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे तीन महिन्यात एकूण १२०० मेगावॅट वीज उपलब्ध केली.

पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल त्यावेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार १९०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात मागणीनुसार उपलब्ध वीज नाही, अशी समस्या जाणवली नसल्याचे महावितरणने सांगितले.

पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरु

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी राज्यात महावितरणकडून मोठ्या प्रमाणात पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर गरजेनुसार काही वेळ वीज पुरवठा खंडित करावा लागतो. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर महावितरणकडे वीज उपलब्ध असूनही ग्राहकांना पुरवठा करता येत नाही.

महिना विजेची मागणी अतिरिक्त वीजखरेदी पॉवर एक्सचेंजवरून पंजाब/पॉवर बँकिंग

(मेगावॅटमध्ये) (मेगावॅटमध्ये) (युनिटमध्ये) करार (मेगावॅटमध्ये)

मार्च २४,९८३ ३०० १३९ दशलक्ष युनिट ५००

एप्रिल २४,३२६ ४०० ३२९ दशलक्ष युनिट ४५०

मे २४,०४७ ४०० २१६ दशलक्ष युनिट २५०

उन्हाळ्याच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी करून मागणीनुसार पुरवठा करण्यात यश मिळविले आहे.

- विजय सिंघल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT