मुंबई

मालाडमध्ये तीन मजली इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळली, ११ ठार

दीनानाथ परब, विराज भागवत
  • आसपासच्या तीन इमारतीही जुन्या असल्याने रिकाम्या करण्यात आल्या

मुंबई: शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. (residential structure collapsed) या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले. जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या (old building) आणि जर्जर अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. (Mumbai Malad West Malwani New Collector compound 3 floor building collapsed 11 died)

"ही घटना दुर्दैवी आहे. तळमजला आणि वर दोन मजले अशी या बिल्डिंगची रचना आहे. ही बिल्डिंग दुसऱ्या बिल्डिंगवर कोसळल्याने मोठा अपघात घडला. १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले असून त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस प्रशासन योग्य पद्धतीने तपास करत असून त्यानुसार कारवाई करेल", अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

"आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवाशी अडकले असण्याची शक्यता आहे. नागरिकांची सुटका करण्यासाठी बचाव पथकाकडून काम सुरु आहे" असे मुंबई ११ झोनचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले.

मालाड पश्चिमेला मालवणी गेट नंबर ८ जवळ इमारत कोसळण्याची ही दुर्घटना घडली. फायर ब्रिगेडकडून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. तीन मजली इमारतीचा दुसरा आणि तिसऱ्या मजल्याचा भाग लागून असलेल्या एक मजली चाळीवर कोसळला. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

"पावसामुळे इमारत कोसळली. बचाव कार्य सुरु आहे. जखमी रहिवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे" अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली. "सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. दोन जणांनी आम्हाला इमारत सोडण्यास सांगितली, तेव्हा मी बाहेर आलो. मी बाहेर आल्यानंतर पाहिले, तीन इमारती कोसळल्या" असे घटनास्थळी उपस्थित असलेला स्थानिक रहिवाशी सिद्दीकीने सांगितले.

मृतांची नावे-

(१) साहिल सर्फराज सय्यद (मुलगा/ ९)

(२) आरिफा शेख ( मुलगी/८)

(३) जोहन इरराना (मुलगा / १३)

(४) ४० वर्षीय व्यक्ती ( नाव माहीत नाही)

(५) १५ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)

(६) ८ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)

(७) ३ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)

(८ ) ५ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)

(९) ३० वर्षीय महिला ( नाव माहीत नाही)

(१०) ५० वर्षीय महिला (नाव माहीत नाही)

(११) ८ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)

जखमींची नावे-

(१) मरीकुमारी हिरांगणा ( महिला ३० गंभीर)

(२) धनलक्ष्मी ( महिला / ५६)

(३) सलीम शेख (पुरुष / ४९)

(४) रिझवाना सय्यद (महिला /३५)

(५) सुर्यमणी यादव ( पुरुष / ३९)

(६) करीम खान ( पुरुष /३०)

(७) गुलजार अहमद अन्सारी ( पुरुष / २६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT