मुंबई

मुंबईतील चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी लवकरच 'ही' सेवा सुरू

महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा


अलिबाग : कोरोनामुळे उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी बंद करावी लागलेली रो-रो सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे बंदर विभागाचे प्रयत्न आहेत. गणेशोत्सवामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असते. मुंबईतून बाहेर निघतानाच तासन् तास ट्राफिक जाममध्ये अडकल्याने चाकरमान्यांचा प्रवास वैतागवाणा होत असतो. ही रो-रो सेवा सुरू झाल्यास कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास काही प्रमाणात सुखकारक होणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळणे शक्य नसल्याने सध्या कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीची सर्व साधने बंद आहेत. यामुळे खासगी वाहनाने प्रवास करणे या एकमेव पर्यायाचा जास्तीत जास्त वापर होत आहे. मुंबईतून भाऊचा धक्का ते मांडवा बंदरापर्यंतच्या या सेवेचा उपयोग अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो. गणेशोत्सवानिमित्ताने येणारे चाकरमानी खासगी वाहनांना प्राधान्य देणार असण्याची शक्यता असल्याने रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे खासदार सुनिल तटकरे यांचे म्हणणे आहे. या सेवेने मुंबईतून स्वतःच्या वाहनात बसून आपल्या घरापर्यंतचा प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर इतर साधनांपेक्षा रो-रोमधील प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सोईचे ठरणार आहेत.

या दृष्टीने कोकणातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून गणेशोत्सवानिमित्ताने कोणत्या प्रकारच्या प्रवासी सुविधा देता येतील यावर चर्चा करण्यात आली. काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करून अंतिम स्वरूप दिले जाईल. यामध्ये रो-रो सेवेला प्राधान्य देण्याची मागणी केली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. साधारण नारळीपौर्णिमेनंतर जलवाहतूक सुरू होते. या जलवाहतुकीचा उपयोग कोरोनाच्या साथीमध्ये प्रवाशांच्या वाहतुकीसाठी करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. मेरिटाईम बोर्डाकडेही यासंदर्भातील मागणी काही नागरिकांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

चक्रीवादळ पाहणी दौऱ्यासाठी वापर
15 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार होते; परंतु कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम बंद झाल्याने मुख्यमंत्री या समारंभाला आले नव्हते. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळानिमित्ताने त्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह रो-रोतून प्रवास केला होता. खासदार सुप्रिया सुळे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय समितीने नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौऱ्याचा प्रवास रो-रोमधून केला होता.

या सेवेचा येथील नागरिकांना निश्चितच उपयोग होईल. परंतु, विद्यमान परिस्थितीत जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करूनच मुंबईच्या नागरिकांना प्रवेश देणे आवश्यक आहे. 
- अॅड. प्रवीण ठाकूर,
उपाध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेस कमिटी

अद्ययावत रो-रो बोट, आवश्यक स्टाफ, जेट्टी तयार आहे; मात्र, 15 मार्चला उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरोनामुळे ही सेवा बंद ठेवावी लागली आहे. या बोटीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. यासंदर्भात मेरिटाईम बोर्डाशीही पत्रव्यवहार झाला आहे. फक्त प्रतीक्षा आहे ती शासनाकडून वाहतुकीसंदर्भात कोणते आदेश येतात याची.
- हाशिम मोंगिया,
मालक, रो-रो सव्हिसेस

बारमाही जलवाहतूक सुरू राहण्याची क्षमता रो-रो सेवेमध्ये आहे. रेल्वे, एसटी या प्रवासी वाहतुकीमध्येच ही सेवा येत असल्याने प्रवासी वाहतुकीसंदर्भात जे 
निकष लावले जातील तेच या सेवेसाठी लागू होणार आहेत. पाहणी दौऱ्यानिमित्ताने लोकप्रतिनिधींनी या सेवाचा आनंद लुटला आहे. ती सामान्य जनतेसाठी 
सुरू व्हावी. 
- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरिटाईम बोर्ड

--------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT