मुंबई

जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी घाटकोपरमध्ये रहिवासी आक्रमक

निलेश मोरे

घाटकोपर - नौदलाच्या पाचशे मीटर परिसरात येणाऱ्या घाटकोपर पूर्व आणि पश्‍चिममधील जीर्ण इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने आज रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. घर नाही तर मतदान नाही, अशा घोषणा देत 350 इमारतींमधील रहिवाशांनी पालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव केला आहे. 

मुंबईत महानगरपालिका, म्हाडा, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे अनेक वसाहतींचे काम रखडले आहे. अशातच घाटकोपर पूर्व-पश्‍चिमेला असलेल्या जवळपास 350 हून अधिक इमारतींचा पुनर्विकास नौदलाच्या परवानगीअभावी रखडला आहे. घाटकोपर पश्‍चिममध्ये नौदलाचे साधनसामग्रीचे मोठे कार्यालय आहे. या कार्यालयाकडून परिसरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींना नवीन बांधकाम करण्यास हरकत घेतली जात आहे. नौदलाच्या पाचशे मीटर परिसरात वर्षानुवर्षे राहत असणाऱ्या रहिवासी इमारतीच्या पुनर्विकासासाठी पालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करत आहेत.

जीर्ण झालेल्या इमारतींना पालिकेने धोकादायक म्हणून नोटीस दिल्या आहेत, तर पुनर्विकासासाठी घेतलेल्या इमारतींना नौदलाकडून परवानगी मिळत नसल्याने बांधकामही रखडल्याने निष्कासित केलेल्या इमारतीतील रहिवाशांना भाड्याने राहावे लागत आहे. विकासकाला परवानगी मिळत नसल्याने विकासकाकडून भाडे मिळत नसल्याच्या तक्रार रहिवासी करत आहेत. जीर्ण इमारती आम्हाला नव्याने बांधण्यास परवानगी मिळत नसेल तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालतो, अशा घोषणा रहिवाशांनी आंदोलनावेळी दिल्या. 

नौदलाची परवानगी मिळत नसल्याने गेल्या सात वर्षांपासून येथील प्रकल्प रखडले आहेत. न्यायालयाकडून परवानगी मिळालेली असताना नौदलाकडून याबाबत हरकत घेतली जात आहे. मतदान करून आजपर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत; मात्र अनेक वर्षांपासून पुनर्विकासाकरिता कोणतीच हालचाल दिसत नाही. पालिकेच्या आगामी निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. घर नाही तर मतदान नाही असा एकत्रित ठराव केला आहे. 
- हरिश्‍चंद्र चिले,
रहिवासी

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai marathi news latest update Residents aggressive Ghatkopar redevelopment buildings

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT