मुंबई

उद्यापासूनपासून टॅक्‍सी, रिक्षाची नवीन भाडेवाढ लागू; जाणून घ्या नवे दर सविस्तर

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या माहामारीमूळे प्रवासी वाहतूक डबघाईस आल्याने राज्य सरकारने रिक्षा,टॅक्‍सीला भाडेवाढ लागु केली आहे. यामध्ये रिक्षा,टॅक्‍सीला प्रत्येकी 3 रूपये भाडेवाढ दिल्याने, आता रिक्षासाठी 21 तर टॅक्‍सीसाठी 25 रूपये मोजावे लागणार आहे. तर नाईट चार्जसाठी एकूण प्रवासाच्या किलोमीटर भाड्याच्या 25 टक्के जास्त भाडे आकारल्या जाणार असून, सोमवार पासून मुंबई महानगरात नवीन दर लागु केले जाणार आहे. 

खटुआ समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी 1 जुन रोजी भाडेवाढ करणे आवश्‍यक होते. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून रिक्षा, टॅक्‍सीला भाडेवाढ देण्यात आली नव्हती, त्यामूळे खटूवा समितीच्या शिफारशीचा आधार घेऊनच यावेळी रिक्षा,टॅक्‍सीला प्रत्येकी 3 रूपयांची भाडेवाढ लागु केली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते. त्यानुसार 1 मार्च पासून मुंबई महानगरांमध्ये ही भाडेवाढ लागु होणार असून, रिक्षा, टॅक्‍सी चालक मालकांनी आपल्या वाहनाचे मिटर कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली आहे. तर 1 जुन पासून रिक्षा, टॅक्‍सीचे मिटरमध्ये नवीन दर दिसणे बंधनकारक राहणार आहे. 

असे असतील नवीन भाडेवाढ 
पहिल्या टप्याला रिक्षाला 18 ऐवजी आता 21 रुपये मोजावे लागेल तर पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 12.1 रुपये यापुर्वी आकारल्या जात होते. त्यामध्ये 2.1 रुपयांची वाढ करून आता 14.20 रूपये तर टॅक्‍सीला 22 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार असून, पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 14.3 रुपयांमध्ये 2.9 रुपये वाढ करून आता दर किलोमीटर 16.93 रूपये आकाल्या जाणार आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai marathi news Taxi, rickshaw fare hike from tomorrow Learn the new rates in detail live latest update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT