मुंबई

Mumbai temperature Update: मुंबईत "वॉर्म संडे" किमान तापमान मात्र "कूल" 

मिलिंद तांबे

मुंबई: मार्च मधील कालचा पहिला रविवार चांगलाच उष्ण ठरला. मुंबईतील कालचे कमाल तापमान शनिवारपेक्षा अधिक नोंदवले गेले. मुंबईत काल कमाल 36 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

मार्च महिन्यात मुंबई मध्ये तापमानाने या पूर्वी अनेकदा उस़ळी घेतली आहे. ही परंपरा काल ही कायम दिसली. कालचा रविवार चांगलाच उष्ण राहिला. मुंबईतील कमाल तापमान 36 अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले.

सांताक्रूझ येथे रविवारी कमाल तापमान 35.6  अंश सेल्सियस तर आद्रता 86 टक्के नोंदवली गेली. तर कुलाबा येथे कमाल तापमान 32.2अंश सेल्सियस तर आद्रता 93 टक्के नोंदवण्यात आले. 

शनिवारी मुंबईकरांना वाढत्या तापमानातून दिलासा मिळाला होता. पारा 4.5 अंशाने खाली आला होता. तर मुंबईतील सरासरी कमाल तापमान 32.8 नोंदवण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळी पासूनच उष्म्यात वाढ होऊन रविवार चांगलाच तापदायक ठरला.

मार्च महिन्यात तापमानाने मुंबईमध्ये अनेकदा उसळी घेतली आहे. त्यामुळे या ही वेळी उन्हाळा पारा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाने केले आहे.
 
मुंबईत कमाल तापमानात वाढ झाली असली तरी कमाल तापमान मात्र घट झाल्याचे दिसते. रविवारी रात्री सांताक्रूझ येथे किमाल तापमान  19.8 अंश सेल्सियस तर कुलाबा येथे 23.0 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली त्यामुळे रात्री काहीसा गारवा जाणवला.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai maximum temperature first Sunday March was very hot recorded

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT