gun firing sakal
मुंबई

Mumbai Crime : मुंबईत माझगाव परिसरात गोळीबार

मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील माझगाव परिसरात मध्यरात्री 3 वाजेच्या सु्मारास हा गोळीबार झाल्याचं पोलिसांकडून माहिती मिळत आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाललेले नाही. गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक भायखळा पोलिसंचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. या गोळीबाराचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

प्रकरण थोडक्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझगावमध्ये मध्यरात्री 3 च्या सुमारास अफजल रेस्टॉरंट परिसरात अज्ञातांनी गोळीबार केला आहे. दहशत पसरवण्यसाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली असून ही गोळी टाळण्यासाठी धावत असलेल्या व्यक्तीला दुखापत झाली. त्याला गोळी लागली नसून धावताना दगड लागल्याने दुखापत झाली.

जखमी झालेल्या मोहम्मद सलमान खान या व्यक्तीला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

भारतीय दंड संहिता कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भायकळा आणि इतर परिसरातील पोलिस या घटनेतील आरोपीला शोधण्यासाठी पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT