Measles Infection esakal
मुंबई

Measles Sickness : सावधान; गोवर घात लावून बसलाय; मृतांची संख्या १३ वर

मुंबईत गोवर बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत गोवर बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

मुंबई - मुंबईत गोवर बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी गोवंडी येथे राहणाऱ्या ८ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून यापैकी ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहेत. तर दिवसभरात १९ रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या २५२ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत गोवर आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून बालकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, २१ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत गोवरचा झपाट्याने प्रसार होत असून शहरात भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, तर पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व , अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, पूर्व उपनगरातील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबईत दिवसभरात गोवरचे १६१ संशयीत रुग्ण आढळले असून संशयीत रुग्णांची संख्या ३,६९५ वर पोहोचली आहे.

गोवर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला असून पालकांनी बालकाचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध केले आहेत. त्यापैकी ९७ बेडवर रुग्ण असून २३३ बेड रिक्त आहेत.

८ महिन्याच्या मुलाचा मृत्यू -

गोवंडी येथील ८ महिन्याच्या मुलाचा २० नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ आले होते. श्वसनाचा त्रास झाल्याने त्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. २१ नोव्हेंबर रोजी त्याची अवस्था सुधारत नसल्याने विशेष रुग्णालयात दाखल केले. २४ नोव्हेंबरला दुपारी १.१० वाजता गोवर सह अवयव काम करण्याचे बंद झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • बुधवारी दिवसभरात १६१ संशयीत रुग्णांची नोंद

  • दिवसभरात ३६ रुग्णांना डिस्चार्ज

  • आतापर्यंत ३४ रुग्ण उपचारासाठी दाखल

  • एकूण घरांचे सर्वेक्षण - ४६ लाख ३ हजार ३८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT