Railway Mega block sakal media
मुंबई

Mumbai : मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लाॅक

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा व ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. १७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना ब्लॉकदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पश्चिम रेल्वेवर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येईल. त्यामुळे रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल.

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान धीम्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल जलद अप आणि डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे त्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला फलाट क्रमांक आठवरून विशेष लोकल चालवण्यात येतील.

कुठे : वसई रोड ते वैतरणादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवार-रविवारच्या मध्यरात्री ११.५० ते पहाटे ४.३० पर्यंत

परिणाम : ब्लाॅकच्या वेळी अप आणि डाऊन मार्गावरील सर्व मेल-एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिराने धावतील. गाडी क्रमांक ०९१०१ विरार-भरूच मेमू पहाटे ४.३५ ऐवजी पहाटे ४.५० वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

Jui Gadkari : जुई गडकरींच्या जीवावर बेतलेला क्षण! रॉयल पाल्म्समध्ये ऑडिशनच्या नावाखाली ‘चकवा’!

'कोण आहे तो शाहरुख खान?' 2050 पर्यंत सुपरस्टारला लोक विसरुन जातील, विवेक ओबरॉयचं वक्तव्य चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी बिनविरोध

आठवीतली ती अन् इंजिनिअरिंगला असलेला तो; खिडकी ठरली मध्यस्थी, घरच्यांना कळलं तेव्हा... वैशाली सामंतची लव्हस्टोरी माहितीये?

SCROLL FOR NEXT