पुरुष नसबंदी Sakal
मुंबई

पुरुषांची नसबंदीकडे पाठ; 5 वर्षांत फक्त 1307 जणांचा पुढाकार

गैरसमजातून पुरुषांनी नसबंदीकडे पाठ फिरवल्याचे मुंबई पालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरातील महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. गैरसमजातून पुरुषांनी नसबंदीकडे पाठ फिरवल्याचे मुंबई पालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. गेल्या पाच वर्षांत फक्त १ हजार ३०७ पुरुषांनी नसबंदी केली आहे. त्याच तुलनेत पाच वर्षांत जवळपास ८१ हजार ६१५ महिलांची नसबंदी झाली आहे. म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत ९८ टक्के महिलांनी नसबंदीसाठी पुढाकार घेतला आहे.

पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया केवळ अर्ध्या तासाची असून अतिशय सोपी आणि सोयीस्कर आहे. मुंबईत शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना १ हजार ४५१ रुपये बँकेत जमा केले जातात. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर किमान काही दिवस रुग्णालयात राहावे लागते. शिवाय आव्हानात्मक शस्त्रक्रिया असल्यामुळे पूर्ण तयारीशी डॉक्टरांना ही शस्त्रक्रिया करावी लागते. याउपर महिलांना दिले जाणारे अनुदानही नगण्य आहे. मुंबईत एका महिलेला नसबंदी केल्यानंतर २५० रुपये दिले जातात.

त्यात जर त्या महिलेने जातप्रमाणपत्र आणि लग्न प्रमाणपत्र सादर केले, तर त्या महिलेला २५० आणि ३५० असे एकूण ६०० रुपये दिले जातात. म्हणजेच एवढे कमी अनुदान मिळत असले, तरी महिला नसबंदी करून घेण्यात पुढे आहेत. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुंबईतील १२ हजार १३८ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अवघे ४३ म्हणजे नगण्य होते.

मुंबईतील २८ प्रसूतिगृह, १७ उपनगरीय रुग्णालये आणि चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया मोफत केली जाते, पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया अतिशय सोपी आहे, असे पालिकेच्या कुटुंबकल्याण विभागाच्या विशेष अधिकारी डॉ. वैशाली चंदनशिवे यांनी सांगितले.

पुरुषांचे समुपदेशन होणार

१ नसबंदीबाबत अनेकदा पती-पत्नीचे एकत्र समुपदेशन केले जाते, परंतु अनेकदा पती केवळ पत्नीलाच आरोग्य केंद्रांवर पाठवून स्वतः ते टाळताना दिसतात. त्यामुळेच पुरुष नसबंदीमध्ये लक्षणीय घट होत आहे. याची दखल घेत पालिकेने प्रसूतिगृह आणि रुग्णालयात नियमित प्रसूतिपूर्व तपासणीसाठी पत्नीसह येणाऱ्या पुरुषांना नसबंदीबाबत समुपदेशन करून कायमस्वरूपी नसबंदीसाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

२ पत्नीच्या प्रसूतिपूर्व तपासणीसाठी पती त्यांच्या पत्नींसोबत प्रसूतिगृहात आणि रुग्णालयांमध्ये जातात. या वेळी नसबंदीचे फायदे यावर समुपदेशन करण्यात येणार आहे. जेव्हा पती-पत्नी दोघे नसबंदीसाठी तयार होतील, तेव्हा त्यांच्या केस पेपरवर याबाबतची माहिती लिहिली जाईल आणि त्यांना नसबंदीच्या प्रक्रियेसाठी पाठवले जाईल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

पाच वर्षांची आकडेवारी

वर्ष एकूण नसबंदी पुरुष नसबंदी महिला नसबंदी

२०१७ -१८ २१,६६४ ९१४ २०,७५०

२०१८- १९ १९,४४८ १८५ १९,२६३

२०१९ -२० १७,७७५ ११६ १७,६५९

२०२०-२१ ११,८५४ ४९ ११,८०५

२०२१-२२ १२१८१ ४३ १२,१३८

पुरुषांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. आम्ही बऱ्याच वेळा पुरुषांना समजावतो; पण हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. शिवाय कोविडमुळेही एकूणच नसबंदीचा आकडा बराच कमी झाला आहे.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT