मुंबई

Mumbai Metro: मेट्रो-३ ला 'Tata'ची वीज; दररोज १६८ मेगावॉटची गरज, प्रतियुनिट आकारणार इतके पैसे

Latest Mumbai News: रात्री साडेदहा वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो असलेली मेट्रो-३ सुरू झाल्यानंतर त्यास दररोज तब्बल १६८ मेगावाॅट वीज लागणार आहे.

संपूर्ण वातानुकूलित असलेली मेट्रो रेल्वे, मेट्रो स्थानके, प्रकाश व्यवस्थेसाठी ही वीज वापरली जाणार आहे. यासाठी टाटा पॉवरकडून साडेसात रुपये प्रतियुनिट दराने वीज घेतली जाणार आहे.

आरे ते कफ परेड हा तब्बल ३३ किलोमीटर लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग आहे. त्यापैकी आरे-बीकेसी हा पहिला टप्पा आठवडाभरात सुरू होणार आहे, तर बीकेसी-कफ परेड हा दुसरा टप्पा मार्च अखेरपर्यंत सुरू करण्याचे एमएमआरसीएलचे नियोजन आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

विजेची आवश्यकता किती?

पहिला टप्पा (आरे ते बीकेसी) - ८० मेगावॉट

दुसरा टप्पा (बीकेसी ते कफपरेड) - ८६ मेगावॉट

एकूण (आरे ते कफपरेड )- १६८ मेगावॉट

---

मुंबईची वीजमागणी वाढणार!

मुंबईची विजेची कमाल मागणी ४,२०० मेगावाॅटच्या घरात आहे. सध्या मेट्रो-३ हा भूमिगत मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाला आला असून इतरही मेट्रो प्रकल्पांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे सर्व मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर मुंबईच्या विजेच्या एकूण मागणीत मोठी भर पडणार असल्याचा अंदाज वीजतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT