Mumbai Metro esakal
मुंबई

Mumbai Metro: मुंबई मेट्रो सेवा कोलमडली; गाड्या अडकल्या, मेट्रोच्या ट्रॅकवरुन प्रवासी निघाले चालत Video Viral

मुंबई मेट्रो सेवा कोलमडली आहे. दहिसर ते कांदिवली दरम्यान गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील सेवा यामुळे प्रभावित झाल्या आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- मुंबई मेट्रो सेवा कोलमडली आहे. दहिसर ते कांदिवली दरम्यान गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील सेवा यामुळे प्रभावित झाल्या आहेत. मागील तासभरापासून मेट्रो सेवा बंद असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. (Mumbai Metro collapses Trains stuck passengers suffering as services stopped)

सकाळच्या सुमारास मुंबईकर घाईत असतात. त्यांना कामासाठी आपल्या इच्छितस्थळी वेळेवर पोहोचायचं असते. लोकलला गर्दी असल्याने अनेकजण मेट्रोचा पर्याय निवडतात. पण, आज सकाळीच मेट्रो सेवा कोलमडली. दहिसर ते कांदिवली दरम्यान गाड्या अडकल्या होत्या. तासभर अशीच परिस्थिती राहिली. यावेळी काही प्रवाशांनी मेट्रोच्या ट्रॅकवरुन चालत रस्ता कापला.

कोणतीही पूर्व सूचना न देता मेट्रो सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा संताप झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मेट्रोच्या सेवेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत आपला अनुभव कथन केला. एकाने म्हटलं की, अशा घटनेमुळे मेट्रो अद्याप तयार आहे की नाही अशी शंका येते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT