Mumbai Metro 
मुंबई

Mumbai Metro : मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेर भराव टाकण्याचे काम सुरू; बंद मार्ग लवकर सुरु करण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खचलेल्या भागात भराव टाकण्याचे काम वेगात पूर्ण केले जात असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. तसेच मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएकडून संबंधित साईटवर सुरु असलेले इमारत बांधणीचे काम पूर्णतः बंद करण्यात आले असून पुढील निर्देशपर्यंत विकासक संबंधीत भागात कोणतेही काम करू शकत नाही.

तसेच, प्राथमिक पाहणी अहवालानुसार, विकासकाच्या चुकीमुळेच आणि अटींचे उल्लंघन केल्यानेच मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खचल्याचे आढळून आले असल्याचे, एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार, सरकता जिना आणि उद्वाहकानजिकची जमीन खचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) तात्काळ प्रवेशद्वार, उद्वाहक आणि सरकता जिना प्रवाशांसाठी बंद केला. तर महानगरपालिकेनेही हा रस्ता तात्काळ बंद केला आहे.

महानगरपालिकेकडून विकासकाला काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देखरेखीत विकासकाकडून खोदलेल्या भागात भराव टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करण्यासाठी साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

यादरम्यान मेट्रो स्थानकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्थानकाचे आयआयटीच्या तज्ज्ञ व्यक्तींमार्फत परीक्षण करण्यात येणार आहे. तर या पाहणीनंतर सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही एमएमएमओसीएलने दिली आहे.

दरम्यान, कामाच्या प्रगतीबाबत माहिती देताना एमएमआरडीएने सांगितले, संबंधित ठिकाणी बॅकफिलिंग प्रक्रियेसह, कॉम्पॅक्शनचे काम प्रगतीपथावर आहे. याकामावर चोवीस तास सुरु असलेल्या कामावर आमचे बारकाईने लक्ष आहे. बृहमुंबई महानगरपालिका एमएमआरडीए लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे! उत्तरेकडील प्रवेश-निर्गमन तात्पुरते बंद केल्यामुळे होर असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असेही एमएमएमओसीएलने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT