metro services MMRDA Mumbai sakal
मुंबई

Mumbai Metro: मुंबई महानगरातील मेट्रोचे पहिले जाळे मुंबईकरांच्या पसंतीस

मेट्रो१, मेट्रो २ आणि मेट्रो ७ ने दरदिवशी लाखो मुंबईकरांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी- वर्सोवा-दहिसर पूर्व यामार्गांवरील तिन्ही मार्गावरील मेट्रो १, मेट्रो २ अ (पिवळी लाईन) आणि मेट्रो ७ (लाल लाईन) आता मुंबईकरांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे.

नव्याने धावणाऱ्या मेट्रो २ आणि मेट्रो ७मुळे आधीच्या मेट्रो १च्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी आहे.

नवीन मार्गिका सुरु होण्यापूर्वी मेट्रो १ची प्रवासी संख्या आठवड्यात दरदिवशी ३.८० लाख ते ३.९० लाखांच्या घरात होती. सद्यस्थितीत ही संख्या १ लाखाने वाढली असून ती आता ४ लाख ते ४.१० लाखांच्या घरात आहे.

मेट्रो १ने दिलेल्या आकडेवारीनुसार, नवीन मेट्रोमर्ग सुरु होण्यापूर्वी डिसेंबरमध्ये मेट्रो १ मधून १ कोटी मुंबईकर प्रवास करत होते.

तर नव्याने सुरु झालेल्या मार्गिकेनंतर जानेवारीमध्ये १ कोटी १ लाख आणि फेब्रुवारीमध्ये २८ दिवसात ९८ लाख मुंबईकरांनी मेट्रो १ मधून प्रवास केला. एकट्या मार्चमध्ये १ कोटी ५ लाख इतक्या प्रवाश्यांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. येणाऱ्या काळात या प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मेट्रो १, मेट्रो २ आणि मेट्रो ७ हे तीनही मेट्रो मार्ग एकमेकांना जोडल्याने मुंबईकरांची सोय होत आहे. या मार्गावरील प्रवाश्यांच्या सोयीसाठी दहिसर ते अंधेरी या मार्गावर आखलेल्या मार्गावर जानेवारी महिन्यात मेट्रोची सेवा सुरु झाली.

नव्याने सुरु झालेल्या मार्गत ‘मेट्रो २ अ’वरील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक, ‘मेट्रो १’वरील डी. एन. नगर स्थानकाशी जोडलेले आहे.

त्यामुळे दहिसरच्या दिशेने येणाऱ्या मेट्रो प्रवाशांना वर्सोवा आणि घाटकोपरला जाणे तर ‘मेट्रो ७’वरील गुंदवली स्थानक ‘मेट्रो १’च्या पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकाशी जोडले गेले आहे.

त्यामुळे दहिसर पूर्व येथून ‘मेट्रो ७’ने येणाऱ्यांना आता गुंदवलीला उतरून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वर्सोवा आणि घाटकोपरच्या दिशेने जाणे सोयीस्कर झाले आहे.

या तीन मार्गिकांमुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो वनच्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना त्याचा लाभ होत आहे.

मेट्रो १ मार्ग

'मेट्रो १' मार्गावर एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. यात वर्सोवा, डी.एन.नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, विमानतळ रस्ता, मरोळ नाका, साकीनाका, असल्फा रोड, जागृती नगर, घाटकोपर या स्थानकांचा समावेश आहे.

प्रवासी संख्या

डिसेंबर १ कोटी ०१ लाख (३१ दिवस)

जानेवारी १ कोटी ०१ लाख (३१ दिवस)

फेब्रुवारी ९८ लाख (२८ दिवस)

मार्च १ कोटी ०५ लाख (३१ दिवस)

मेट्रो ७ मार्ग

मेट्रो-७ मार्गावर १३ स्थानकांचा समावेश आहे. ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

प्रवासी संख्या

२ एप्रिल २०२२ पासून पहिला टप्पा सुरू केल्यापासून १ कोटी ९३ लाख ४५ हजार ०६० हजार मुंबईकरांनी प्रवास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT