मुंबई

मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर!!!

सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो 1च्या 30 फेऱ्या गुरूवारपासून (८ एप्रिल) वाढणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. राज्य सरकारने वाहतूकीसंदर्भात दिलेल्या निर्बंधाचे पालन करण्यासह प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यावर मेट्रो प्रशासनाने भर दिला आहे. कडक निर्बंध काळात प्रवाशांना मेट्रोच्या दररोज 200 फेऱ्यांची सुविधा मिळणार आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावले आहेत. शासकीय कार्यालयातील 50 टक्के उपस्थिती तर, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 'ब्रेक द चेन' अंतर्गंत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो 1च्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोच्या दररोज 280 फेऱ्या होत होत्या. पण राज्य सरकारच्या नियमावलीमुळे 170 फेऱ्या करण्यात आल्या. मात्र, प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मेट्रोच्या प्रवाशांना 170 फेऱ्या कमी पडताना दिसून आले. मेट्रो प्रशासनाच्या वतीने प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची संख्येची माहिती, गर्दी होणारी स्थाानके, गर्दीची वेळ यांचा अभ्यास करून गुरूवारपासून 30 फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. मात्र शनिवारी, रविवारी कडक निर्बंध असल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गंत मेट्रोच्या फेऱ्या कमी करण्यात येतील, अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सद्यस्थितीमध्ये वर्सोवा स्थानकातून पहिली मेट्रो सकाळी 6.50 मिनिटांनी सुटत असून घाटकोपर स्थानकातून शेवटची मेट्रो 10 वा.15 मिनिटांनी सुटत आहे. मेट्रो सुरू होण्याच्या 15 मिनिटांपूर्वी मेट्रोची प्रवेश दारे खुली केली जात आहेत. लॉकडाऊन काळात मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर रोजी अनलॉकमध्ये मेट्रोची सेवा सुरु करण्यात आली. यावेळी मेट्रोमध्ये दररोज साधारण 80 हजार प्रवासी प्रवास करत होते. सर्वसामान्य प्रवाशांना फेब्रुवारी महिन्यात लोकल सेवा सुरू केली. त्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत 10 हजाराने वाढ झाली. तर, आता सुमारे 1 लाख 10 हजार प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी 280 फेऱ्या चालविण्यात येत होत्या. पण राज्य सरकारने जाहीर केलेल्या कडक निर्बंधामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. आता 90 हजार ते एक लाख प्रवासी संख्या मेट्रोतून प्रवास करत आहे. या प्रवासांसाठी सुमारे 200 फेऱ्या चालविण्यात येणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT