mumbai metro Sakal
मुंबई

Mumbai Metro : ‘मेट्रो २ अ’च्या स्थानकांची दुर्दशा ; पुन्हा ऑडिट करण्याची नामुष्की

Mumbai Metro : सर्व मेट्रो स्थानकांचे ऑडिट करण्याचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Metro : मेट्रो २ अ आणि ७ चे उद्घाटन मोठ्या धडाक्यात करण्यात आले. मात्र, ही मेट्रोसेवा सुरू झाल्यापासून वर्षभराच्या आतच या स्थानकांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बुधवारी मंडपेश्वर मेट्रो स्थानकाबाहेरील काचेचे पॅनल कोसळून एका रिक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्व मेट्रो स्थानकांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो २ अ च्या एकूण १७ स्थानकांपैकी ३ स्थानकांवर दर्शनी भागात असलेल्या काचेच्या फलकांचा वापर करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ज्या स्थानकाच्या दर्शनी भागात काचेचे पॅनल वापरण्यात आले आहेत, त्या ३ स्थानकांचे ऑडिट करण्यात येणार आहे. १० दिवसांच्या आत ऑडिट पूर्ण होण्याची शक्यता आहे. आढावा घेऊन इतर ठिकाणी कार्यवाही केली जाईल. आयसी कॉलनी मेट्रो स्थानकाच्या दर्शनी भागातील काचेचे पॅनल काढून टाकण्यात येत आहे. हा सर्व खर्च कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती एमएमआरडीएने द

ठिकठिकाणी बिघाड

पहिल्याच पावसात ‘मेट्रो २-अ’च्या आनंदनगर मेट्रो स्थानकाच्या छतातून पाणीगळती झाली. तर खासगी विकसकाकडून पर्जन्य जलवाहिनीला तडा गेल्याने मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या एका बाजूला धोका निर्माण झाला. इतकेच नाहीतर एमएमआरडीएला या मेट्रो स्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आयआयटीच्या माध्यमातून ऑडिट करण्याची नामुष्की ओढावली. या अहवालात आढळून आलेल्या त्रुटीनंतर पुन्हा एकदा पिअर रिव्ह्यू करण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT