Mumbai Metro Sakal
मुंबई

मुंबई मेट्रोला मिळाला 'प्रोजेक्ट एक्सलन्स अवॉर्ड'

प्रोजेक्ट मॅनेजर्स ग्लोबल समिट 2021 च्या उद्घाटन समारंभात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 'प्रोजेक्ट एक्सलन्स अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - प्रोजेक्ट मॅनेजर्स ग्लोबल समिट 2021 च्या उद्घाटन समारंभात मुंबई मेट्रो (Mumbai Metro) रेल कॉर्पोरेशनला 'प्रोजेक्ट एक्सलन्स अवॉर्ड' (Project Excellence Award) प्रदान करण्यात आला. आयपीएमएचे सदस्य, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असोसिएट्स (पी.एम.ए.) इंडियाचे प्रादेशिक संचालक टी. श्रीनिवासन यांनी हा पुरस्कार प्रदान केला. राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या एकूण चार प्रकल्पांमध्ये मुंबई मेट्रोला हा पुरस्कार मिळाला.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट असोसिएट्सचा वार्षिक कार्यक्रम या वर्षी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आला. या वर्षी ग्लोबल समिटची थीम 'प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑप्टिमायझेशन फॉर रिझिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी' होती. 23 आणि 24 ऑगस्ट 2021 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पी.एम.ए. राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी चांगल्या प्रकारे राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे यश आणि कामगिरी साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो.

हा पुरस्कार एक सन्मान आहे. तो आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देईल. आधुनिक अभियांत्रिकी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देखील देईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT