Metro Concession Card sakal
मुंबई

Mumbai Metro : मेट्रोच्या ७ आणि २ अच्या विशेष सवलतीच्या दरातील सेवेला प्रारंभ

१ मे महाराष्ट्र दिनापासून मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत देण्यात येणार, घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

१ मे महाराष्ट्र दिनापासून मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत देण्यात येणार, घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुंबई - १ मे महाराष्ट्र दिनापासून मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत देण्यात येणार, घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेनंतर एमएमएमओसीएलचे व्यवस्थापकीय संचालक एस.व्ही.आर. श्रीनिवास विशेष सवलतीच्या मेट्रो ट्रिप्सचा पहिला पास लाभार्थ्यांना सुपूर्द केला. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-१ कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील.

मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल. यासुविधेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT