mumbai metro  Sakal
मुंबई

Metro : मेट्रो ९ साठी राज्य सरकारकडून नव्या जागेला मंजुरी

दहिसर ते मीरा रोडदरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा या उद्देशाने एमएमआरडीए १०.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ९’ मार्गिकेची उभारणी करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथील डोंगरी गावातील जागेच्या पर्यायाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. लवकरच ही जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येईल. मुळआराखड्यानुसार या मार्गिकेसाठी राई, मुर्धा, मोर्वा या गावात कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र येथे कारशेड उभारण्यास स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला होता.

दहिसर ते मीरा रोडदरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा या उद्देशाने एमएमआरडीए १०.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ९’ मार्गिकेची उभारणी करीत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून आराखड्यानुसार ठरविण्यात आलेल्या कारशेडच्या जागेला स्थानिकांनी विरोध केला.

हा मुद्दा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातदेखील उपस्थित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांची रहिवाशांच्या मागणीचा विचार केसाची भूमिका घेतली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत अखेर रहिवाशांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मोर्वा, राई, मुर्धा येथील कारशेड रद्द केली.

स्थानिक रहिवाशांनीच कारशेडसाठी पर्यायी जागा सुचविली होती. त्यानुसार राज्य सरकारने उत्तन येथील डोंगरी गावातील जागेचा पर्याय निवडला आहे. मात्र आता सुधारित आराखड्यानुसार 'मेट्रो ९'च्या मार्गाचा ५ किमी पर्यंत विस्तार करणे आवश्यक आहे. त्यानुसार जमीन हस्तांतर झाल्यास सुधारित आराखडा तयार केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT