Mahada  sakal
मुंबई

Mumbai : वांद्रे पश्चिममधील जागेत म्हाडा उभारणार व्यावसायिक संकुल

काही दिवसांपूर्वी याजागेत गृहनिर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र याजागेत व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार असल्याची माहितीही म्हाडाने दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai - वांद्रे पश्चिम येथील तब्बल ३ हेक्टर जागेवर म्हाडा व्यवसाय संकुल उभारणार आहे. ही जागा वांद्रेतील मोक्याच्या ठिकाणी असल्याने म्हाडाकडून या जागेचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत म्हाडाचा तब्बल ३० हजार चौ. मी.चा भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण झाले असल्याने आता या भूखंडाचा विकास करण्यापूर्वी झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत योजना राबवून येथील झोपडपट्टी धारकांना हटविण्यात येईल. काही दिवसांपूर्वी याजागेत गृहनिर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र याजागेत व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार असल्याची माहितीही म्हाडाने दिली आहे.

म्हाडाच्या मुंबई आणि उपनगरात अनेक भूखंड असून या भूखंडावर झोडपडपट्टी धारकांनी अतिक्रमण केले आहे. मात्र मुंबईतील जागांची कमतरता लक्षात घेता म्हाडा अशा जागांवरील अतिक्रमण हटवून त्याभागांचा विकास करणार आहे.

हा विकास करत असताना आवश्यक तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यात येईल. वांद्रेतील अशाच एका जागेचा म्हाडा विकास करणार आहे. वांद्रे पश्चिम येथील अग्निशामक केंद्रासमोरील जागेत म्हाडा व्यावसायिक संकुल उभारणार आहे.

याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून म्हाडा याठिकाणी व्यावसायिक संकुल उभारणार आहे. हा भूखंड वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्वला जोडणाऱ्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने याठिकाणी व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय झाला असून, याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद बोरीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT