मुंबई

Mumbai Temperature: मंगळवार ठरला मुंबईच्या या मोसमातील सर्वात थंड दिवस

मिलिंद तांबे

मुंबईः मुंबईच्या तापमानात पुढच्या काही तासात आणखी घट होण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मंगळवार हा या मोसमातील सर्वात थंड दिवस म्हणून नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी मुंबईत 15 अंश सेल्सिअस तापमान होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेमध्ये किमान तापमान नोंदवले जे 2.4 डिग्री सेल्सियस होते. तर कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 17 डिग्री सेल्सियस होते.

पुढील 48 तासात तापमानात हळूहळू घट होऊन किमान तापमानातही आणखी घट होण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली. आयएमडीच्या अंदाजानुसार, 48 तासांत किमान तापमान 14 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहील. तर कमाल तापमान 28 अंश डिग्री सेल्सियस इतके असेल. डिसेंबर महिन्यात दोन्ही तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वी 23 डिसेंबरला या मोसमातीस सर्वात कमी तापमान 15.8 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वात कमी तापमान 16.4 डिग्री सेल्सियस होते आणि त्यापूर्वीच्या वर्षात ते 14.4 डिग्री सेल्सियस होते.

“उत्तरेकडून पश्चिमकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात घसरण होत आहे. मुंबईतील काही ठिकाणी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.

पवईमध्ये मुंबई शहरातील सर्वात थंड तापमान नोंदवले असून 12.8 अंश सेल्सिअस होते. त्यानंतर, गोरेगाव येथे 13.8 अंश सेल्सिअस तापमान आणि कांदिवली येथे 13.9 अंश सेल्सिअस तापमान होते. मंगळवारी वरळीत किमान तापमान किमान 25 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai minimum temperature coldest day season 15 degree celsius

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT