मुंबई

मुंबईत अल्पवयीन मुलीला अ‍ॅफ्रोडिसियाक्स इंजेक्शन देऊन बलात्कार

लैंगिक संबंधांच्या व्हिडिओ क्लिपची धमकी देऊन शेजारी ब्लॅकमेल करत होता

दीनानाथ परब

मुंबई: अंधेरीतील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि बलात्कार (rape) प्रकरणात चौघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारी पीडित एका व्यावसायिकाची मुलगी आहे. शेजारी राहणाऱ्या एका जोडप्याने गोळ्या आणि इंजेक्शनच्या (injection) स्वरुपात उपलब्ध असलेले अ‍ॅफ्रोडिसियाक्स (aphrodisiacs injection) घेण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. शेजाऱ्याने माझे लैंगिक शोषण केले. त्याच्या पत्नीला याची माहिती होती, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. जोडप्याने हे आरोप फेटाळले आहेत. (Mumbai minor girl injected with aphrodisiacs and raped by neighbour)

या प्रकरणात अटक झालेल्या अन्य दोन आरोपींपैकी एक पीडित मुलीचा चुलत भाऊ आणि एक काका आहे. काकाच्या १९ वर्षीय मुलासोबत पीडित मुलीचे संबंध होते, असे तक्रारीत म्हटले आहे. मुलाचे वडिल म्हणजे तिचे काका तिला उत्तर प्रदेशला घेऊन गेले. मुलीच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळण्यासाठी तिथे तिचे लग्न लावून देण्याचा विचार होता, असे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना लिहिलेले २७ पानी पत्र आंबोली पोलिसांना मिळाले आहे.

या पत्रात पीडित मुलीने लिहिले आहे की, "तिला अ‍ॅफ्रोडिसियाक्सच्या गोळ्या खाण्याची सवय लागली होती. लैंगिक संबंधांची आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, असे सांगून शेजारी ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे मी नैराश्यामध्ये गेले." त्यानंतर मुलीने उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तिच्या चुलत भावाला फोन केला व मदत मागितली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीडित मुलीने तिला उत्तर प्रदेशला नेण्यात आले. तिथे तिचे चुलत भावासोबत संबंध होते. काही महिने हे प्रेमसंबंध सुरु होते. काकांनी मला चुलत भावाशी लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले होते, असे पीडित मुलीने तिच्या जबानीमध्ये म्हटले आहे.

मुलीच्या वडिलांनी केलेल्या किडनॅपिंगच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांचे पथक दिल्ली आणि उत्तर प्रदेशला गेले व अमेठीमधुन मुलीची सुटका केली. मुलीची चुलत भाऊ आणि काकाला शनिवारी अटक करण्यात आली. शेजारचे जोडपेही पोलिसांच्या ताब्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT