Mumbai Bhayander Fire Esakal
मुंबई

Mumbai Fire: भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग; अनेक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Mumbai Bhayander Fire : भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील भाईंदर येथे आगीची मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या भाईंदर येथील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची माहिती आहे. भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आग लागली आहे. पहाटे ५ वाजण्याच्या सुममारासही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

आगीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मीरा-भाईंदर परिसरात लागलेल्या आगीचे अनेक किलोमीटर अंतरावरून अवकाशात धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये आगीचे मोठे लोटदिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT