Mumbai  
मुंबई

Mumbai : मिसींग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासातील २५ मिनिट वाचणार; प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरून एकत्र येणारी घाटातील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या दृष्ट्रीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मिसिंग लिंकची उभारणी केली जात आहे. सध्यास्थितीत ९० टक्के लिंकचे काम पुर्ण झाले असून, एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन अखेर लिंकचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे.

सातत्याने मुंबई-पुणेसाठी वेगवान पद्धतीने वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या द्रुतगती महामार्गावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे वाहतुक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढतांना दिसून येत आहे. मिसींग लिंक सुरू केल्यास घाटातील वाहतुक कोंडी कमी होणार असल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करण्यात आले आहे. तर खोपोली एक्झिट से कुसगाव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. च्या राहिलेल्या लांबीसाठी १.६८ कि.मी आणि ८.८७ कि.मी चे दोन बोगदे करण्यात आले आहे.

दोन व्हायाडक्टचे बांधकाम असे एकूण १९.८४ कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता बांधणे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट सिहगड संस्था १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनीटांची बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर लहानपणापासूनच करा ‘या’ गोष्टी; करीना कपूरने सांगितला पालकांसाठी खास सल्ला

Latest Marathi News Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर टीका; बडतर्फीची मागणी

SCROLL FOR NEXT