Mohit Kamboj esakal
मुंबई

Mumbai : मोहित कंबोज याना न्यायालयाकडून दणका; फसवणुकीच्या गुन्ह्यात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायलयाने फेटाळला

सीबीआयकडे या प्रकरणी पीके जगन, डेप्युटी जनरल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -भाजप नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध सुमारे 100 कोटीच्या फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला.टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि भाजप नेते मोहित कंबोज तसेच अन्य आरोपींनी 100 कोटींची बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सीबीआयकडे या प्रकरणी पीके जगन, डेप्युटी जनरल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या तक्रारीवर टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक/जामीनदार आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. टेनेट एक्झिम कंपनी तिचे सीएमडी कंबोज आणि संचालक आणि अन्य आरोपींना यांनी खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूककेल्याचा आरोप आहे.

आरोपांमध्ये बँकेकडून 50 कोटी रुपयांची क्रेडिट सुविधा मिळविण्यासाठी खोटे कागदपत्रे दाखल करण्याचा समावेश आहे. आरोपींनी अप्रामाणिकपणे कर्जाचा निधी कंपनीतून इतर बँक खात्यात वळवण्यात आला. बँकेचे सुरुवातीला 103.81 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि 26 फेब्रुवारी 2020 रोजी वन-टाइम सेटलमेंटनंतर ते 94.39 कोटी रुपयांवर आले.सीबीआयने सादर केलेला अंतिम अहवाल फेटाळताना न्यायालयाने सीबीआयच्या तपास अपूर्ण असल्याचे मत नोंदवले आहे. न्यायालयाने खोटी कागदपत्रे सादर करण्याचा या गुन्ह्यांचा आरोप असल्याचे कारण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT