heavy rainfall sakal media
मुंबई

गुलाब वादळ: मुंबईत कोसळल्या मुसळधार पावसाच्या सरी

मिलिंद तांबे

मुंबई : अरबी समुद्रात (Arabian Sea) दाखल झालेल्या गुलाब वादळाचा (Gulab cyclone) मुंबईवर चांगलाच परिणाम झाला. बऱ्याच भागात आज मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडला. आज सकाळी पासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाळा सुरवात झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याचे दिसले. मुंबई शहर,पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात ही पावसाने जोरदार बॅटींग केली. पवई (Powai) मध्ये सर्वाधिक 88.3 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल हाजी अली 77.73 मिमी, माझगाव 66.53 मिमी,वांद्रे 63.72 मिमी, भायखळा 54.87 मिमी पावसाची नोंद झाली. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाल्याने दिवसभर अंधार दाटून आला होता. पावसासोबत वारे देखील वेगाने वाहत होते.

मुंबई शहर 70.59,पूर्व उपनगर 75.84 तर पश्चिम उपनगरात 67.98 मिमी पाऊस पडला. 24 तासात मुंबईत 71.47 मिमी पावसाची नोंद झाली.उद्या देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी अनेक लोक सकाळी छत्री न घेता घराबाहेर पडली होती. त्यामुळे अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांच्या नजरा छत्रीच्या दुकानाकडे वळल्या होत्या. छत्र्यांच्या स्टॉल वर गर्दी झाल्याने स्वस्त मिळणाऱ्या छत्र्या दुपट किमतीने विकल्या जात होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे काय? परवानगी मिळणार का?

IND vs SL 1st Test: रिषभ पंतने इतिहास रचला! असे 'शतक' झळकावणारा तो भारताचाच नव्हे, तर आशियातील पहिला फलंदाज ठरला

बाबो! प्राजक्ता माळीनं मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर, २८ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

Marathi News Updates : राहुल गांधी पुण्यात येणार?, पुण्यात जमावबंदी लागू

Ganeshotsav 2026 : सुमारे 9 वर्षांनंतर दुर्मिळ योग! यंदा 10 ऐवजी तब्बल 12 दिवस रंगणार गणेशोत्सव; जाणून घ्या नेमके कारण

SCROLL FOR NEXT