Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : भाईंदर येथे विषबाधेमुळे आई व मुलाचा मृत्यू

मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही घरच्यांनी दरवाजा उघडला नाही.

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर - विषबाधेमुळे आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदर पश्चिम जवळील मुर्धा गावात घडली आहे. याच प्रकरणात महिलेचा दीरही बेशुद्धावस्थेत सापडला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयत उपचार सुरु आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

मुर्धा गावात रहाणारे राम चव्हाण हे मित्रासोबत बुलढाणा येथे गेले होते. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास ते घरी आले. मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही घरच्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे चव्हाण यांनी खिडकीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता त्यांची पत्नी कविता व आठ वर्षांचा मुलगा रोहित जमिनीवर पडलेले दिसून आले.

चव्हाण यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी रोहित याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कविता मात्र जिवंत होत्या. त्याचप्रमाणे घराच्या स्वच्छतागृहाजवळच चव्हाण यांचा भाऊ शाम हा देखील बेशुद्धावस्थेत पडला असल्याचे त्यांना दिसले.

त्यांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र शनिवारी सकाळी कविता यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शाम चव्हाण हे अद्याप बेशुद्द्धावस्थेत आहेत अशी माहिती भाईंदर पोलीसांनी दिली.

प्रथमदर्शनी अन्नातून विषबाधा झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे मात्र घरात फिनाईलची रिकामी बाटली देखील पोलीसांना आढळून आली आहे. अन्नाचे नमूने व फिनाईलची बाटली तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT