Mumbai MP Dr Shrikant Shinde pays more attention work of U-type road will done soon Ganpat Gaikwad  Sakal
मुंबई

Mumbai : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जास्त लक्ष घातले तर यु टाईप रस्ताचे काम लवकर होईल - गणपत गायकवाड

सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडे आहेत, कारण मुख्यमंत्री तुमचे वडील आहेत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्त्याचे काम लवकर व्हावे यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यात पुढाकार घेत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. राजकारणात माझ्याकडे बोट दाखवले जात असले तरी सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत.

कारण मुख्यमंत्री तुमचे वडील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घ्यायला वेळ लावत नाही पण त्यांनी ते मनात आणलं पाहिजे असे म्हणत आमदार गायकवाड यांनी खासदार डॉ. शिंदे यांना कल्याण पूर्वेतील विकास कामांकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

कल्याण पूर्वेतील एका कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा आमदार गणपत गायकवाड हे एकच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणात आमदार गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील विकास कामांबद्दल बोलताना खासदार डॉ. शिंदे यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली.

कल्याण पूर्वेतील काटेमानवली नाका ते गणपती चौक व्हाया म्हसोबा चौक ते तिसगाव नाका या यु टाईप रस्त्याचे 80 फुटाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला कल्याण डोंबिवली पालिकेने सुरवात केली आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे.

हे काम पाहता यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला तर येत्या काळात हा रस्ता लवकर होऊ शकतो. असे आमदार गायकवाड म्हणाले. ते पुढे म्हणाले खासदार डॉ. शिंदे यांनी यात जास्त लक्ष घातल पाहिजे.

सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडे आहेत कारण मुख्यमंत्री तुमचे वडील आहेत. जरी राजकारणाच्या दृष्टीने माझ्याकडे बोट दाखवले जात असले तरी जनता तुमच्याकडे बघते. कारण का तर शिंदे साहेबांनी विचार केला तर शिंदे हे असे मुख्यमंत्री आहेत की ते निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत. जलद निर्णय घेतात पण त्यांनी मनात आणलं पाहिजे.

आणि तो यु टाईप रोड झाला पाहिजे. आपण पाहिलं तर ज्या शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले असते त्याचा विकास होतो. या विकासासाठी लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे असे मत आमदार गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे खासदार शिंदे आता याकडे लक्ष घालणार कां हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT