Mumbra dog news 
मुंबई

Mumbai Mumbra: रस्त्यावरून जाणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरून कुत्रा पडला, दुर्दैवी मृत्यू

Mumbra news girl died after dog fall on her: कुत्रा थेट चिमुकलीच्या अंगावर पडला. कुत्रा अंगावर पडल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले

कार्तिक पुजारी

Mumbai Mumbra: मुंब्य्रात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुत्रा अंगावर पडल्याने एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. चिमुकली तिच्या घरच्यांसोबत रस्त्यांवरून जात होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर वरून कुत्रा पडला. यानंतर ती जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली रहदारीच्या रस्त्यावरून आपल्या आईसोबत जात होती. त्यावेळी इमारतीच्या एक मजल्यावरून एका कुत्र्याने खाली उडी घेतली. हा कुत्रा थेट चिमुकलीच्या अंगावर पडला. कुत्रा अंगावर पडल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा उपयोग झाला नाही.

पाचव्या मजल्यावरून हा कुत्रा चिमुकलीच्या अंगावर पडला होता. कुत्रा देखील या घटनेमध्ये जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणीप्रेमींनी कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले आहे. यासंदर्भातील एक सीसीटीव्ही समोर आला आहे. यात दिसतंय की, कुत्रा अंगावर पडल्यानंतर चिमुकली बेशुद्ध पडते. कुत्रा देखील काहीवेळ निपचित पडतो. पण, त्यानंतर तो उठून रस्त्याच्या कडेला जातो.

घटना अमृत नगर भागातील आहे. येथील चिराग मेंशन इमारतीच्या टेरिसवर जैद सैयद नावाच्या व्यक्तीने कुत्रा पाळला होता. याच कुत्र्याने पाचव्या मजल्यावरून उडी घेतली होती. घटनेची माहिती मिळताच, प्राणीप्रेमी कुत्र्याला घेण्यासाठी आले होते. या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : लग्न जुळत नसल्याने युवकाने संपवलं जीवन

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT