mumbai-municipal-corporation sakal
मुंबई

Mumbai News : धोकादायक इमारतीबाबत पालिका ऍक्शन मोडवर; वीज, पाणी कनेक्शन तोडण्यास केली सुरुवात

पावसाळ्यात अतिधोकादायक इमारतींपैकी २७ इमारतींचे वीज पाणी कनेक्शन कट केले आहे. १९३ इमारती धोकादायक झाल्याने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पावसाळ्यात अतिधोकादायक इमारतींपैकी २७ इमारतींचे वीज पाणी कनेक्शन कट केले आहे. १९३ इमारती धोकादायक झाल्याने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर ८२ इमारती रिकाम्या केल्या असून १०१ इमारतींचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्व्हेक्षण करण्यात येते. या सर्व्हेक्षणात अतिधोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आल्यास रहिवाशांनी अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येते. मात्र इमारतीतील रहिवासी न्यायालयात दाद मागतात आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाला कार्यवाही करणे शक्य होत नाही.

त्यामुळे अशा धोकादायक इमारती राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला पावसाळ्यात इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळून जिवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे इमारत खाली करत अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिका आयुक्त व प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी केले आहे.

मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये मोठी दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींचा समावेश ‘सी-२’ करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येतात. तर जीर्ण झालेल्या इमारतींचा समावेश ‘सी-१’ म्हणजेच ‘अतिधोकादायक’ श्रेणीत करून या इमारती तत्काळ रिकामी करण्याचे निर्देश देण्यात येतात. नोटीस बजावूनही या इमारती रिकामी न केल्यास वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येत. दरम्यान, दुर्घटना करण्यासाठी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अतिधोकादायक इमारतींची स्थिती

  • एकूण अतिधोकादायक इमारती - ४२९

  • पालिकेकडून पाडण्यात आल्या - १९३

  • कोर्टात प्रलंबित प्रकरणे - १०१

  • रिकाम्या केलेल्या इमारती - ८२

  • वीज-पाणी कापले - २७

धोकादायक इमारती

  • शहर - ३२

  • पूर्व उपनगर - ६५

  • पश्चिम उपनगर - १२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT