Students Poisoning sakal
मुंबई

Poisoning : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर येथील शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

जीवन तांबे

चेंबूर - मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूर येथील शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील आणिक गांव पालिका शाळेच्या इयत्ता सहावी आणि सातवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मध्यान भोजन देण्यात आले. जेवण केल्यावर विद्यार्थ्यांना 11.30 उलटी, मळमळ, पोटात दुखू लागले. याबाबत त्यांनी शिक्षक व कर्मचारी यांना सांगितले.

ही परिस्थिती पाहून शाळेतील शिक्षकानी विद्यार्थ्याना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले..एकूण 16 विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचार घेणारे विद्यार्थी एकूण 12 ते 13 वर्षे वयोगटातील आहे.

अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या जेवणाचे नमुने जमा केले असून ते दादर येथील पालिका लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी हे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकारी व पालिका अधिकारी यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. इतर ठिकाणची कोणतीही तक्रार आलेली नाही.

- गंगाधरन (जॉईंट बीएमसी कमिशनर)

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.अन्न बाधेमुळे एखाद्या विद्यार्थ्यांवर किडनी, लिव्हर खराब होते. या करिता त्यांना निरीक्षणा करिता ठेवले आहे.24 तासानंतर घरी पाठवायचे की ठेवायचे त्याचा निर्णय घेऊ

- डॉ. सुनील पाकळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी (पालिका शताब्दी रुग्णालय)

जेवण केल्यानंतर काही तासानंतर उलटी झाली आणि पोटात दुखू लागले आम्ही लगेच शिक्षका सांगून पालकांना बोलविले. आता तब्बेत बरी आहे.

- किशोर सरमाल (विद्यार्थी)

मुलांना वेळेत उपचार मिळले म्हणून बरे झाले. विषबाधा कशामुळे झाली यांचा योग्य तपास करण्यात यावा.

- अस्लम सिद्धीकी (पालक)

काही वेळा जेवणाबरोबर शाळेतील टाकीतील पाण्यामुळे ही मुलांना त्रास होऊ शकतो. यांची योग्य चौकशी करण्यात यावी.

- राजू नगराळे ( समाजसेवक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT