mumbai municipal corporation covid scam corruption Iqbal Singh Chahal share his opinion
mumbai municipal corporation covid scam corruption Iqbal Singh Chahal share his opinion sakal
मुंबई

कोविड घोटाळ्यावरही मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी मौन सोडले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिशय कडक शिस्तीचे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे प्रथमदर्शनी अतिशय कठोर मनाचे वाटतील, पण याच व्यक्तीमधील अतिशय हळवा व्यक्ती हा आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आला. निमित्त होते इक्बाल सिंह चहल - कोविड वॉरियर पुस्तकाचे. मुंबई महानगरपालिकेत कोरोनाच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर चहल यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने आपले मत मांडले. रूग्णांच्या जीवापुढे काही निर्णय पैसे न बघता घ्यावे लागले यामागची नेमकी काय परिस्थिती कारणीभूत होती, याचाही उलगडा चहल यांनी केला. पण हा सगळा अनुभव सांगताना चहल यांना गहिवरून आले. अतिशय दबक्या आवाजात चहल यांनी त्यावेळची परिस्थिती विषद केली. पण त्यांचा धाडसी निर्णय हा २१ हजार जणांचा जीव वाचवणारा ठरला हे सांगण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते.

वॉट्स एपवर दिली २ लाख इंजेक्शनच्या कुप्यांची ऑर्डर

देशभरात जेव्हा कोरोनाच्या रूग्णांसमोर रेमडेसिवीर इंजेक्शनचा जेव्हा जगभरात तुटवडा होता, तेव्हा मुंबईतही अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी वणवण फिरावे लागत होते. अशावेळी हाफकीन इन्सिट्यूटने ४०० रूपये मोजून मायलॅन इंस्टिट्यूटकडून रेमडेसिवीर खरेदीची निविदा काढली. या कंपनीच्या तुलनेत मुंबई महानगरपालिकेने २ लाख इंजेक्शनच्या कुप्या मिळवण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली. पण मुंबई महानगरपालिकेला मात्र १६६८ रूपये प्रति कुपी असा दर मिळाला. या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेला २३ कोटी रूपये अतिरिक्त मोजावे लागणार होते. पण मुंबईतील २१ हजार रूग्ण हे रेमडेसिवीरच्या प्रतिक्षेत होते. साडेचारशेपट दर देऊन मुंबई महानगरपालिकेने या कुप्या घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी हाफकीनच्या दरामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी मायलॅनच्या व्यवस्थापकीय संचालकांना फोन केला. तेव्हा २ लाख कुप्या या मुंबई महापालिकेने ४ एप्रिल २०२१ रोजी खरेदी केल्या तरच मिळतील. दुपारी ४.३० वाजता चहल यांनी फोन केल्यावर ६.३० वाजेपर्यंत वर्क ऑर्डर निश्चित करा असेही मायलॉनकडून सांगण्यात आले होते. त्याचवेळी देशातील १२ राज्ये ही प्रतिक्षेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पण त्यावेळी जास्त मोजल्या जाणाऱ्या पैशांपेक्षाही २१ हजार प्रतिक्षेतील नागरिकांचे जीव जास्त महत्वाचे होते. माशासारखे लोक तडफडत मरताना पाहवत नव्हते असे सांगताना चहल यांनाही गहिवरून आले.

तर चौकशीलाही तयार

त्यामुळेच हे जीव वाचवण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांनी सायंकाळी ६.२८ वाजता आपल्या मोबाईलच्या वॉट्स एपवरून वर्क ऑर्डर ही मायलॉन कंपनीला दिली. एखादा खासगी व्यवहार व्हावा तसाच व्यवहार या इंजेक्शन खरेदीसाठी झाला. त्यावेळी एसीबीच्या चौकशीची मागणीही करण्यात आली. पण २१ हजार लोकांचे जीव वाचवण्यासाठी चौकशी लागली तरीही चालेल म्हणून मी त्यासाठीही सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. महत्वाचे म्हणजे मायलॉन कंपनीने वेळप्रसंगी इंजेक्शनच्या कुप्या या एअरप्लेननेही पाठवण्याची तयारी दाखवली.

मुंबई महापालिकेचा दर देशात सर्वात किमान राहिला

मुंबई महापालिकेने १६६८ रूपयांनी हे इंजेक्शन घेतले. पण हाफकीनला आजतागायत इंजेक्शनच्या कुप्या मिळाल्या नाहीत, असेही आयुक्त चहल यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेने या दराने कुप्या खरेदी करतानाच दिल्लीत कुणी ३५ हजार रूपये इंजेक्शनसाठी मोजले, तर कुणी युपीत १ लाख रूपयेही मोजले. हाफकीनची निविदा प्रक्रिया पुढे रद्द झाली, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा दर सर्वात कमी राहिला. पुढे जाऊन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुंबईने इंजेक्शन खरेदीसाठी जो निर्णय घेतला, त्यानुसार निर्णय प्रक्रिया राबवण्याचेही आदेश दिले, अशीही आठवण चहल यांनी सांगितली.

१८९८ पॅन्डेमिक अॅक्टनुसार या काळात युद्धजन्य परिस्थिती असते असा उल्लेख कायद्यातच आहे. त्यामुळे या काळात घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नसते. त्यामुळे औषध खरेदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होता कामा नये. त्याकाळच्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतलेले असतात. त्यामुळेच या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचाही खुलासा त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT