Corona Test sakal
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्ण वाढताच BMC 'अलर्ट मोड'वर, चाचणी केंद्रात वाढ

संपूर्ण मुंबईत 260 कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडचे रुग्णवाढू लागल्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) चाचण्याची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.संपुर्ण मुंबईत 260 कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले असून रोज 35 ते 40 हजार चाचण्या केल्या जात असून आता चाचण्याची संख्या वाढणार आहे. (Mumbai Corona Update)

मुंबईत 15 ऑगस्ट पासून कोविडचे निर्बंध शिथील करण्यास सुरवात झाली.कोविडची दुसरी लाट आटोक्‍यात येताना रोजची रुग्णसंख्या 200 पर्यंत आली होती. मात्र,गेल्या काही दिवसात ही रुग्णसंख्या 450 ते 500 पर्यंत पोहचली आहे.त्यामुळे रुग्ण वेळीच ओळखता यावा यासाठी पालिकेने चाचण्याची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे 260 ठिकाणी चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

सध्या मुंबईत 35 ते 40 हजारा दरम्यान कोविड चाचण्या केल्या जात आहेत.ही संख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.पालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यात हे चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.पालिकेच्या कोविड वॉर रुमला संपर्क साधल्यास याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकते.

"चाचणी वेळेत झाल्यास बाधीतांचे विलगीकरण करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करता येतील.तसेच इतरांना संसर्ग होण्यापासून प्रतिबंध करता येऊ शकतो.तसेच,सहव्याधी असलेल्या जेष्ठ नागरीकांनी विशेष काळजी घ्यावी

-सुरेश काकाणी,अतिरिक्त आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT