मुंबई

मुंबईकरांनो टेन्शन घ्यायचं नाही! सर्व जम्बो कोव्हिड केंद्रांबाबत BMC चा मोठा निर्णय

समीर सुर्वे


मुंबई  : लोकल रेल्वे सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्व प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सहा जम्बो कोव्हिड केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. 31 मार्चपर्यंत जम्बो कोव्हिड केंद्र बंद न करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. 

कोव्हिडचा संसर्ग सध्याच्या परिस्थितीत कमी आहे; मात्र लोकल सुरू झाल्यावर होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जम्बो कोव्हिड केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यांतील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन जम्बो कोव्हिड केंद्रांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जम्बो कोव्हिड केंद्रात प्रामुख्याने विलगीकरण तसेच संशयित रुग्णांना ठेवले जाते. काही प्रमाणात कोव्हिड रुग्णांवरही उपचार केले जातात. दहिसर, गोरेगाव नेस्को, वांद्रे-कुर्ला संकुल, मुलुंड येथे दोन आणि वरळी, भायखळा अशी सहा कोव्हिड केंद्र सध्या सुरू आहेत. ती आता 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार नाहीत. 

478 कोव्हिड केंद्र बंद 
कोव्हिडची भीषण परिस्थिती असताना मुंबईत 517 कोव्हिड उपचार केंद्र सुरू करण्यात आली होती; मात्र आता ही संख्या 39 वर आणण्यात आली आहे. ही केंद्र 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या जम्बो कोव्हिड केंद्रासह कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये 10 हजार 152 खाटा रिक्त आहेत, तर 3243 रुग्ण आणि संशयित रुग्ण, विलगीकरण केलेल्या व्यक्ती येथे आहेत. पालिकेने कोव्हिड काळात सात जम्बो कोव्हिड केंद्रांसह 517 कोव्हिड केंद्र, विलगीकरण केंद्र सुरू केली होती. 

46 कोव्हिड केंद्रांची तयारी 
कोव्हिडवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले आहे; मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने 46 कोव्हिड केंद्र अवघ्या दोन दिवसांत सुरू करण्याची तयारी करून ठेवली आहे. यात उपचारासाठी 8905 खाटा उपलब्ध होतील.

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT